खिशिच्या वड्या

  • बेसन -- १ मो. वाटी
  • पाणी -- १ मो. वाटी
  • मीठ -- चविनुसार
  • हळद -- ३/४ चमचा
  • हिंग -- १/२ चमचा
  • फोडणीचे साहित्य : तेल -- ३ मो. चमचे
  • मोहोरी -- १ छो. चमचा
  • जिरे -- १ छो. चमचा
  • हिंग -- १/२ छो. चमचा
  • कांदे -- २ मध्यम आकाराचे बारिक कापलेले
  • हळद -- १/२ छो. चमचा
  • लाल तिखट -- १ १/२ छो. चमचा
  • गरम मसाला -- १ १/२ छो. चमचा
  • खसखस -- १ चमचा
  • ओले खोबरे -- किसलेले
  • कोथिंबिर -- बारिक कापलेली
३० मिनिटे
३ ते ५ लोकांसाठी

कृती :

प्रथम एका पातेल्यास आतिल सर्व बाजुने तेल व्यवस्थित लावून घ्यावे. मग ते पातेले गॅस वर ठेवावे. त्यात १ १/२ चमचा मीठ, ३/४ चमचा हळद ,१/२ चमचा हिंग घालावे. पाण्यास चांगली उकळी आली की त्यात बेसन घालावे. पीठ व्यव्स्थित घेरावे म्हणजे त्यात गुठळी राहणर नाहि. झाकण ठेवून उकड वाफवावी.  ७-८ मिनिटाने झाकण उघडून पुन्हा उकड हलवून घ्यावी पुन्हा २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवून उकड होउ दयावी. एका ताटास तेल लावून घेणे व  ही गरम उकड ताटात नीट थापून घ्यावी.

फोडणीची कृती :

एका कढईमध्ये २-३ चमचे तेल घालावे तेल तापले की त्यात मोहोरी, जिरे, हींग, कडिपत्ता घालावा तडतडल्या नंतर बारिक कापलेल कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घेने मग त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, खसखस व मीठ घालावे.

आता ही फोडणी थापलेल्या खिशीवर पसरावी. त्यावर किसलेले ओले खोबरे व बरिक कापलेली कोथिंबिर पेरावी. हे सर्व नीट थापून त्याच्या वड्या पाडाव्या.

खिशिच्या पातोड्या खाण्यास तयार आहे.

हा पदार्थ चिंचेच्या चटणीसोबत अधिक लज्जतदार व रुचकर लगतो.

आई