पिंडदान करावे की करू नये? १६.०३.२०१०

निता आंबेगावकरांचा ' पिंड दान करावे की करू नये? ' हा लेख वाचला., लेखास आलेले अभिप्राय पण वाचले . आप आपल्या परीने सर्वांनी ऊकल करण्याचा प्रयत्न केला. हे मी अभिप्राय देऊन देखिल सांगू शकलो असतो. पण थोडस धाडस करून स्वतंत्रच प्रयत्न करत आहे तेंव्हा व्यापारी भाषेतच बोलायचे झाल्यास चुक भुल देणे घेणे. असो....

प्रथम आपण निताजींच्या अनुभवा कडे वळूया. त्यांच्या वडिलांच्या पिंडदान प्रसंगी कावळा कोणत्या परिस्थितीत शिवला तर मुलांनी दोन घास खालल्यावर म्हणजेच काय? ह्या माणसाचे आपल्या मुलांवर खुप प्रेम होते, मुल ऊपाशी असतांना कोणता बाप मुखी ग्रास घेईल बर?. त्यामुळे मुलांनी अन्न घेतल्यानंतर कावळ्याच्या रुपातील ह्या आत्म्याने पिंड शिवला. आता बापासारखीच आईने आपल्या मुलांवर माया केलेली होती . त्या मायेपोटिच त्या माऊलिने नकार दिला असला पाहिजे. नाहितर सद्दगती कोण नाकारेल? ह्या जगात जन्माला आलेला प्रत्येक माणुस स्वर्ग प्राप्तिच्या आकांक्षेने आपले जिवन व्यवहार करत असतो, ईथले कायदे त्याला कदाचित अमान्य असतिल पण वरच्याच्या कायद्यावर त्याची श्रद्धा हि असतेच असते. ह्या जगात कोणत्याही धर्माच्या मानसास विचारा की त्याला नरकात जाणे आवडेल का? तो नाही म्हंणुनच सांगेन! तस जर असत तर आपण गेलेल्या व्यक्तिंच्या माघे कैलास वासी, वैकुंठ वासी, पैगंबर वासी.... इ. बिरुदावल्या लावल्या असत्या का? मुळीच नाही. मेल्या नंतर आपल्याला सद्दगती मिळावी हे प्रत्येकालाच अभिप्रेत आहे.

आता आपण थोडस निताजिंच्या कुटंबाकडे वळु. हम दो आणि हमारे दो असा सुखी संसार असलेली माणस. त्यात आपल्या कुटुंबाला सर्व सुख देण्यासाठी आई वडिलांनी अपार कष्ट घेतले असतील. ह्यावर असा आक्षेप होऊ शकतो की प्रत्येक जण आपल्या कुटंबासाठी हेच करतो ह्यात वेगळ ते काय? . ह्यात वेगळ हे असण्याची शक्यता आहे की एक तर हे कुटंब मध्यम वर्गिय असले पाहिजे. स्वताःच्या कष्टाने ऊर्जित अवस्थेस आल असल पाहिजे , त्यामुळे मला जे मिळाल नाही ते पोरांना मिळाव अशी त्यांची धारणा असली पाहिजे, आणि त्यातल्यात्यात मध्यमवर्गिय माणसाचा सर्वात महत्त्वाचा स्थाई भाव की माझ्या मुळे कोणास त्रास नको हि तर पोटची मुल मग ? माझ्या मुळे....... तेंव्हा ह्या भावनेने प्रेरित होऊन आईने कदाचित कर्मकांडास नकार दिला असला पाहिजे कि माझ्या बाळांपुढे सद्दगती पण फिकी . तेंव्हा एकच गोष्ट हि की असा त्याग फक्त आईच करू शकते . मग पिंड दान केले काय आणि नाही काय ह्याने काय फरक पडतोय? जर जन्म देणारी आइ एवढा त्याग करू शकते तर ज्या धर्माच्या अंगा खांद्यावर लहानाचे मोठे झालो तो धर्म आपल्या मुलांचे अपराध पोटात घालण्याचा त्याग का करू शकत नाहि?

आता थोड शास्त्राकडे वळु.मुळात श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्यात सुक्ष्म अशी पुसटशी रेषा असते अस म्हणतात, देवळात जाणे हि श्रधा आणि बाबा, भगत, तांत्रिकाकडे जाणे हि अंधश्रद्धा असा काहिसा समज आहे खरा . पण धर्म म्हटले कि त्यात ह्या दोन्ही गोष्टी आल्याच . प्रत्येक धर्मात ह्या दोन गोष्टी आहेतच आहे. बर मुद्दा हा नाही आता मुद्दा असा आहे कि ज्याला जे वाटते ते करण्याचा अधिकार आहे कि नाहि? तर ह्या वर मी एक प्रश्न विचारतो बघा हं... आपल्या घरातिलच उदा. घेऊ आता अस समजा ज्याले जे वाटते ते करण्याचा अधिकार जर आपण घरात आमलात आणला तर काय होईल? बाबांना रो ज कार्यालयात जाण्याची इच्छा होईल? आईने कंटाळा आला म्हणून पाकशाळेला सुट्टी दिली तर? ताईला उशिरापर्यंत मैत्रिणीन बरोबर भटकण आवडत , ती रोज उशीरा आली तर ? २२ वर्षाचा मुलगा नग्न वावरू लागला तर? कारण काय , तर त्याला ते आवडत आहे . पण ह्यामुळे ते संपुर्ण घर , आजुबाजुचा परिसर , सगळ कस अशांत होइल कि नाही? मग आता मला सांगा ? ज्याला जसे वाटते तसे वागणे बरोबर आहे का? घराची शांतता टिकावी , समाजाची शांतता टिकावी म्हणून जसे काही नियम समाजानिच मान्य केले आहेत , तर मग धर्माने केलेले नियम मान्य करायला काय हरकत आहे?

राहता राहिला प्रश्न लुटालुटिचा. कोण लुट करत नाही ? वैद्द, वकिल, शिक्षण सम्राट , सर्वच तर लुट करताय मग कर्मकांडाला पैसे लागले तर ती लुट कसलि? ह्या सर्वांना पोट आहे आणि कर्मकांड करणाऱ्यांना नाही , बर असो ही थोडा वेळ मान्य करू हि लुटच आहे म्हणून ! पण मला सांगा, हि लुट काय आपल्याच धर्मात आहे ? बाकिच्या ठिकाणी नाही ? . सभोवताली नजर टाका म्हणजे कळेल आता आत्म्यांच्या भटकण्या विषयी बोलु. हे तर प्रत्येक धर्म मान्य करतो की आत्मा असतो . आणि तो भटकतो म्हणून कोणी त्याला आपल्या रुढी परंपरे नुसार घोस्ट, जीन, भुत असे संबोधतो. शेवटी आत्मा काय किंवा ईश्वर , अल्ला क्रिस्त काय ह्या अनुभुतिच्या गोष्टी आहे त्या कोणाला हात धरून दाखवता थोडिच येणार आहे ?

उदा. दाखल एक प्रसंग इथे देतो माझा पर्यटनाचा व्यवसाय आहे . लोकांना गाड्या भाडेतत्वावर देणे, निवासस्थान उपलब्ध करून देणे हा माझा व्यवसाय. ह्या व्यवसायाअंतर्गत एकदा माझा वाहनचालक यात्रस्थांना नाशिकहून पेण , पनवेल मार्गे गोव्यास घेऊन जात असता शिळ फाट्या जवळ गाडी पंक्चर झाली म्हणून हा स्टेपनी बदलविण्यासाठी खाली उतरला, समोर मिट्ट काळोख, लांबच लांब चाललेला काळ्या रस्त्यावर ओढलेले पांढरे पट्टे, आजुबाजुला सळसळणारी झाड . असा तो प्रसंग. हा आपला खाली उतरला जॉक चढवला स्टेपनी बदलली आणि गाडित बसून गाडी चालवू लागला , तेवढ्यात गाडितला एक जण ओरडला " ए आंधळ्या ! अरे बाई दिसते का नाही तुला ?, अरे रस्त्याच्या मधोमध चालतेय ना ती ! " ह्यानी आपला "कुठे आहे? " म्हणत करकचून ब्रेक दाबला . सगळे आवाक होउन बघायला लागले कुठे बाई दिसते म्हणून पण एकाला दिसेल तर शप्पथ! शेवटी हा झोपेत काही बरळत म्हणून सर्वे ओरडले आणि गाडी चालव म्हणाले . बर ह्यानी गाडी सुरू करून चालवायला सुरवात केली तर काचेवर पारदर्शक पांढऱ्या रंगाचा कपडा ह्याला दिसायला लागला , बर वरती काय म्हणून ह्याने खिडकितून टपावर पाहिल तर ती महामाया बसलेली त्याला दिसली . आता करतो काय ? पठ्याने सुसाट गाडी फेकली आणि वस्तीच्या ठिकाणी येऊन थांबला . काय झाल रे म्हणून इतरांनी विचारल तर मघाचाच पठ्ठा ओरडला टपावर बाई होती म्हणून आता बोला ....

तर ह्या अनुभुतीच्या गोष्टी असतात. कोणी कोणाला कश्या दाखवणार! तर हा अनुभव ज्याचा त्याने घ्यावा हे बरे!