तीन तारका नभात

एक पेटती मशाल
दोन वीर, दोन बैल
तीन तारका नभात
चार पैंजणे श्रमून चालली

चालली श्रमून चार पैंजणे
दोन नार त्या नरांस भेटणे

एकजीव गाठ आणि जानवे
जातपात धर्मही न आठवे

चोळी भिजून पोचल्या घरी घामात न्हालेल्या
कोणी घरात घेतल्या नार दारात आलेल्या

गर्भपात वैद्य सुचवितो जसा
पापणीत थेंब दाटतो तसा

कोण तो मला न माहिती म्हणे
मात्र त्यास बाप आज मी गणे

एक तान्हुले उंबरा चाट चाट चाटणारे
आपले असुनी मला परकेच वाटणारे

तीन तारका नभात
चार पैंजणे