आजचे बलुतेदार

तुमचा पेशा तुम्हाला आवडतो का? त्यात थोडंफार वेगळेपण आहे का? तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का? मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा.

बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक "करीअर गाइडस" ही व्यवसायाची निवड, कॉलेजांच्या याद्या, परीक्शांची वेळापत्रके, फी, आणि फॉर्म्स यात अडकलेली दिसतात. मुलाखत देण्यांबाबत सल्लेही असतात. मात्र एकदा एखादा व्यवसाय निवडल्यावर त्यातील आयुष्य कसं असतं याबद्दल माहिती अभावानेच आढळते.
या पुस्तकात वेगवेगळ्या ३०-३५ क्षेत्रांतील व्यावसायिक आपापले अनुभव सांगणार आहेत. त्यात त्यांच्या पेशांचं गुणगान नसलं तरच नवल, पण त्याबरोबरच त्यांची आव्हाने, त्यांना करायला लागणार्या तडजोडी, आणि कदाचित फ्र्स्ट्रेशन्सही असतील. "माझं करियर" पेक्शा "माझ्या दृष्टीकोनातून माझा पेशा" असं त्याचं स्वरूप असेल. वाचकवर्ग असेल दहावी-बारावी-कॉलेजच्या पुढची-मागची मुलं, त्यांचे पालक, आणि पेशांच्या/लेखांच्या वैविध्यामुळे सर्वसामान्य चोखंदळ वाचकही. मराठी आव्रुती पुण्यातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था करणार आहे, तर इंग्रजी आव्रुत्तीसाठीही प्रकाशक तयार आहे. आतापर्यंत खालील पेशांचा सहभाग नक्की झाला आहे, आणि त्यांची लिखाणंही पूर्ण होत आली आहेत:
रेडियो जॉकी, टेक्निकल रायटर, कंपनी सेक्रेटरी, जेमॉलॉजिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, शेफ, भाषांतरकार/अनुवादक, एन्वायर्न्मेंटल प्लॅनर, पशुवैद्य, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी लॉयर, साउंड रेकॉर्डिस्ट, सेल्स मॅनेजर, अ‍ॅनिमेटर, टीवी कलाकार, एम पी एस सी ऑफिसर, एंटर्टेन्मेंट जर्नालिस्ट, स्पोर्ट्स ट्रेनर, "टीच फॉर इंडिया" फेलो, क्लिअरिंग आणि फोरवर्डिंग एजंट, टूर लीडर, मर्चंट नेवीमन
निवडीसाठी काही ढोबळ निकष लावले आहेतः
- साधासुधा डॉक्टर, इंजिनीयर, आयटीवाला नको (म्हणजे मी स्वतःही बाहेर)
- पेशा अगदीच "रेअर" नसावा, पण "हटके" असल्यास बरं
- त्या त्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी वगैरे केलेली असण्याची अट नाही
- शक्यतो भारतातच कारकीर्द हवी आह
- पुस्तकाच्या रॉयल्टीची सर्व रक्कम एका संस्थेला अर्पण होणार असल्याने, कुठल्याही आर्थिक मोबदल्याच्या अपेक्षा नसावी
सविस्तर माहितीसाठी मला खालील ईपत्त्त्यावर थेट संपर्क करा: एम एम अंडरस्कोअर जोशी अ‍ॅट हॉटमेल डॉट कॉम
तुमच्या ओळखीतल्या एखाद्याची/एखादीचा आठवण झाली तरी त्या व्यक्तीशी माझ्याशी गाठ घालून द्या.
धन्यवाद!
- कोंबडी
(हाच मजकूर इतर काही संकेतस्थळांवरही टाकला आहे)