आमचा मण्या खुपच गुणी
जेवायला बसताना विसरतो पाणी
खेळण्यापुढे सारेकाही विसरतो
कार्टुन मात्र न चुकता बघतो
मण्याला आवडतात स्केटींगचे बुटे
न पडता जातोऱ्येतो इकडून तिकडे
अभ्यास याला नकोसा असतो
गोष्टीचे पुस्तके दिवस-रात्र वाचतो
मण्याला येतात भरपुर गाणी
आहे किनई आमचा मण्या गुणी