जाने कहा गये वोह दिन................

जाने कहा गए वो दिन ...............

बर्याच दिवसांपासून काही गोष्टींची आठवण येत होती ,मन रमलं आणि लिहायला सुरवात केली ....

रामबो सर्कस ......
काळ
परवा मी Z -ब्रिज वरून चलो होतो,लक्ष गेला ब्रिज खाली चालू असलेल्या सर्कस
कडे आणि थोड्या जुन्या आठवणी तझ्या झाल्या ........
लहान असताना शाळेच्या मैदानात सर्कस भरायची .वर्षातून एक दोन दा आणि उन्ह्ल्याच्या सुट्टीत तर हमखास ........
रविवारच्या संध्याकाळच्या show चे पास आम्हाला शाळेत फुकट मिळायचे ....
मग काय ,शाळेत प्रत्येक मुलाच्या तोंडावर एकच चर्चेचा विषय,एकच उत्साह आणि रविवार एकदाचा कधी उगवतोय ह्याची मनात तत्परता .....
शाळेतील
मित्रांन बरोबर सर्कस बघण्याची माजा काही वेगळीच होती,आम्ही सर्कस कमी
बघायचो आणि टवाळक्या जास्त करायचो ,आमच्या करामती मुळे एखादा प्राणी
घाबरला असता तर त्यच काही विशेष नसता वाटला ,तेवढच लोकांचा अधिक मनोरंजन
झाला असत ....
एकदा सर्कस बघून माझा मन नाही भरायचा ,म्हणून आईला थोडी
फूस लावायची आणि गुरवारी (बाबांच्या सुटीच्या दिवशी ) परत एकदा सर्कस
बघयला जायच.घरच्यां बरोबर जाणायचे अनेक फायदे असायचे .... एकतर न मागता
कॉल्ड ड्रिंक(गोल्ड स्पोट ) आणि पोप कॉर्न मिळायचा आणि show झाल्यावर
हॉटेल मध्ये जेवायला ...
मजाच मजा....
घरी
आल्या नंतर सगळ्या मित्रांना काय सांगू आणि काय नाही असा व्हायचा ,ते सगळा
सांगता सांगता मी स्वताच सर्कस मधला कलाकार बनून जायचो .......
"त्यने अशी उडी मारली .....तो असा पडला "
"काय गाडी चालवत होता तो माणूस .... दोन्ही हात सोडून ....wroooong wrooong"
"तो माकड त्या पोरीच्या डोक्यावर जाऊन बसला .... "
"त्या हत्ती ने कसला सिक्स मारला ....... "

अजून बरायचं आठवणी आहेत ,लिहण्यासाठी बरच काही आहे .....
साधारण
दहा एक वर्ष झाली असतील मी सर्कस बघितलीच नाही आहे ...... शाळेच मैदान
अजून पण आहे ,पण तिथे आता सर्कस भरत नाही ....मित्र पण आहेत ,वेळ पण आहे
,पण कोणी यायला तय्यार नसत ......
१००-१५० चा तिकीट काढून सिनेमाला जाता येत मला पण,सर्कस बघण्याची आवड आता राहिली नाही...
आज
माझ्याकडे करमणुकीचे बरेच साधन आहेत ,घर बसल्या TV वर जगातील प्रत्येक
सर्कस बघता येते ,amusement पार्क आहेत ,multiplex आहेत,इंटरनेट आहे ,वेळ
सुद्धा आहे ,पण सर्कस नको वाटते आता .....
वय वाढत गेल आणि उत्साह कमी
होत गेला ..आता तर गोल्ड स्पोट पण भेटत नाही .. कारणं बरेच आहेत ,पण
त्यांची मीमांसा करत बसलो तर अजून जास्त प्रश्न निर्माण होतील ...... असो
जाने कहा गए वो दिन ...............

स्कूटर .....
माझ्या घरात आलेल पाहिलं दुचाकी वाहन ......बजाज स्कूटर ....
१९९४-१९९५
मध्ये बाबांनी स्कूटर विकत घेतली .... ८०-९० च्या काळात स्कूटरला खूप
मागणी होती ,लोकांना waiting वर थांबव लागायचा ,२-३ महिने झाल्या नंतर
कुठे नंबर लागायचा ......
मला स्कूटरच भलतच कौतुक होत ,सगळ्या मित्रां
मध्ये मी खूप मीरवाय्चो....रोज बाबा शाळेत घ्यायला आणि सोडायला यायचे
.....रोज कुठे ना कुठे भटकंतीला घेवून जायचे .... त्या दुग दुग चालणार्या
गाडीवर बसण्यातच माझा शौक होता ....
बाबांच गाडीवर अफाट प्रेम होत....
अजून आठवत ,सुटीच्या दिवशी ते स्वताच tool kit घेवून गाडी दुरुस्त
करायचे...थोडा oiling करायचे ,break tight करायचे ,linar check करायचे
...अजून बराच काही ...मला काही कळायचा नाही ,पण गम्मत वाटायची ....
गाडीच्या
देखरेखीच थोडा काम माझ्याकडे पण होत..... गाडीला फडका मारायचा ,तिला
धुवायचा,उन्ह -पावसाळ्यात तिच्यावर कवर टाकायचा ,सुटीच्या दिवशी लहान टवाळ
पोरांपासून तिला दूर ठेवायचं ..... एवढा मी आवर्जून कराचो
गाडीचा आवाज मला पाठ झाला होता ...१०० स्कूटर मधून नेमकी आपली स्कूटर कोणती हे मी डोळे बंद करून सांगू शकत होतो .....
स्कूटर आता म्हातारी झाली आहे गेल्या १५-१६ वर्षात अनेक खड्ड्यातून ती गेली आहे ,पण बाबांची ही दुग्दुगी अजून ठीक ठाक चालते ......
स्कूटरला आता कासवाचे पाय आले आहे ,जरा जास्त इंधन खाते,थोड लक्ष जास्त द्यावा लागता ,पण अजूनही तिचा पूर्ण रंग उडालेला नाही ...
स्कूटर
आता काही अमूक तमूक,होशी लोकांकडे दिसते , दसरा दिवाळीला आजकाल कोणी
स्कूटर बूक करताना दिसत नाही ,बाईकच्या युगा मध्ये कुठेतरी ती हरवली आहे
.......
मी पण आजकाल जास्त स्कूटर चालवत नाही ,त्याच कारण म्हणजे ,मी
एकतर आकार नसलेल्या फुग्य सारखा फुगलो आहे आणि माझी उंची पण जरा जास्तच
वाढली अही ,त्यामुळे स्कूटर वर मी बसलो की मलाच जरा विचत्र वाटत,हती ने
सायकल चालवावी असा काहीतरी प्रकार होतो....
पण काहीही झाला तरी स्कूटर
चालवण्याची मजा काही निराळी आहे ,ज्यांनी चालवली त्यानीच अनुभवली ...मनाशी
मी पक्का निर्णय केला आहे ,किती हि गाडी जुनी झली तरी मी तिला कधीच विकणार
नाही ...
बाबांची आठवण म्हणून आणि घरातील पहिली गाडी म्हणून तरी नक्कीच .......
बाबा म्हणायचे "ज्याला स्कूटर चालवता येते ,तो जगातील कुठले ही वाहन चालवू शकतो "

उन्हाळ्याची सुट्टी आणि खेळ ......

लपा
छुपी ,डबे डूब ,डबा आईस पईस ,डाकिन ,किंग कोंग ,कुकुद्धून ,सूरपारंब्या
,लंगडी ,खो खो ,कबडडी ,चीर्घोडी ,घोडेस्वार ,शिवना पाणी ,झटा -पट ,शीरा
पुरी ,चल्लेंगे ,झबु ,मैंडी कोट ,पाच -तीन -दोन ,भिकार सावकार , सती लावणी
,रम्मी ,पकडा पकडी ,लीन्गोडचा ,नागमोडी ,व्यापार .....अजून बरेच खेळ आहेत
,जे तुम्ही एकतर लहान पणी खेळला असाल ,किंवा काही खेळ पहिल्यांदा ऐकले
असतील ...पण तुम्हाला तुमच्या लहानपणीची आठवण झाली असेल .....
उन्हाळ्याची
सुट्टी लागली रे लागली कि मग ह्या सर्व खेळांची पाळी ,पूर्ण सुट्टी भर
आलटून पालटून येताच असायची ...एखादा खेळ पूर्ण आठवढा भर चालायचा तर एखादा
१ -२ तासच फक्ता ...खेळांची आणि खेळणार्यांची कमी कधी नव्हतीच ....
पोरांची
उन्हाळ्याची सुट्टी कशी घालवायची ??असा प्रश्न आमच्या आई वडिलांना कधी
पडलाच नसेल ,कारण आमचं आख्या सुट्टीत एकाच कर्म आणि धर्म ..ते म्हणजे दिवस
भर खेळत राहणे ,न थांबता !!!.....
दिवसाचं अगदी चोह्क प्लान्निंग असायच
... दिवस सुरु व्हायचा क्रिकेट पासून ,दुपारच्या जेवणा पर्यंत आमचे
तेंडूलकर ,गावस्कर ,वेंगसरकर .... जोशी ,पाटील ,काळे ,देशपांडेच्या
घराच्या खिडकीचे काच फोडून टाकायचे ....दोन तीन चेंडू फुटल्या शिवाय खेळ
पुढे सरकाय्चाच नाही ..... दुपारी पूर्ण कळप कोणा न कोणाच्या घरी डेरा
टाकून बसायचा ,मग रंगायचे पत्त्यांचे ,कॅरम आणि गपा गोष्टीचे डाव .....
संध्याकाळी पाळी डबे डूब आणि लपा छुपीची .... दोन तीन दिवसापर्यंत एकावरच
राज्य चालू असायच ......
ह्या सर्व खेळांन मध्ये मग मारा मारी , झटा-पट ,शिवी गाळ,हमरा तूमरी हा रोजचाच भाग असायचा ....
खेळा
व्यतिरिक्त पण अजून बरायचा गम्ती जमती करायचो .... रोज पटांगणात अंगत पंगत
असायची ,जो तो आपले डबे घेवून बसायचा आणि ताव मात्र सर्वांच्या डब्यावर
मारायचा ...दुपारी कुल्फीवाला किंवा बर्फ गोळेवाला आला कि मग छोटे काय
मोठे काय ...... सर्वांची मजा .... एखाद्या दिवशी स्वारी निघायची पेरूच्या
बागेत ,कधी कधी रात्री कारखानीस काकू भुताच्या गोष्टी सांगायच्या.........

उन्हाळा
,गर्मी !!!काय असते हे आम्हाला कधी कळच नाही ,कधी कोणी danceचा,गाण्याचा ,
स्केटिंगचा क्लास लावला आहे असा कधी झालाच नाही .... कोणी मामच्या गावी
गेलं असलं तर २ -३ दिवसत परती नकीच असायची ... कोणी न कोणी आजारी पडायचच
,बाबांचा मार आणि आईच्या बोलण्या तर रोजच खाव्या लागायच्या ..... आनंद
होता ...
ह्या सगळ्या गोष्टी आठवत बसलो कि अगदी लहान होऊन जातो ,आज
कालच्या पोरांना हे सगळी खेळ क्वचितच माहित असतील ,video game आणि
पोकेमोनच्या राज्यात कधी कधी वाटतं बर झाला आपल्या वेळेस असं काही नव्हता
......
दिवसभर उन्हात ,मात्तीत ,घामात माख्लीलो मी कधी रात्री पोटात पाय घेऊन झोपायचो मला कधी कळच नाही ...

माझा
जगणं अश्याच अजून असंख्य छोट्या छोट्या गोष्टी वसलेलं आहे ... वय आणि काळा
बरोबर बर्याच गोष्टी आठवणीच्या ठेवीत रुजत गेल्या ,त्या तिथेच राहिल्या
आणि मी पुढे पुढे चालत गेलो .... आज धावपळीच्या जीवनात असंख्य विचार मनात
चालू असतात ,रेल चेल चालू असते ...पण मग ह्या गुदमरलेल्या मनात जेव्हा
ह्या जुन्या आठवणीचे दिवे चमकू लागतात तेव्हा कुठे जाऊन मन शांत होत
,त्याला विसावा मिळतो आणि परत मग नव्या चैतन्न्याने मी पुढे चालत राहतो
....
अशेच बरेच विचार काही दिवसांपासून मनात गर्दी करून बसले होते आणि
आठवणींच्या राज्यात मी स्वतःला विसरून गेलो होतो ...... क्वचित तुमच्या ही
बरोबर असच काहीतरी होतअसेल ...

"जाने कहा गये वोह दिन................"