माझ्या कवितेची चोरी

महाजालावर वाङमयचौर्य सर्रास होते हे अनेकांकडून ऐकले होते. आज मला
स्वत:लाही त्याचा अनुभव आला. सहज जालभ्रमण करता करता पियुष तायडे ह्यांच्या
मराठी कविता ब्लॉगवर
पोहोचलो. तिथे मला माझी "काहीतरी चुकत गेले" ही कविता सापडली,
मात्र तिच्याखाली कवी म्हणून कोणा प्रियांका वर्तक ह्या बाईंचे नाव आढळले.
माझी कविता मनोगतवर १७-०७-२००८ रोजी
इथे प्रकाशित झाली होती,
व त्याच दिवशी माझ्या गुंजारव
ह्या जालनिशीवर इथे प्रकाशित
झाली होती
.

तायडे ह्यांना ई-मेल पाठवून वस्तुस्थिती कळवली आहे, त्यात पुरावा म्हणुन
वरील दुवेही दिले आहेत, व ती कविता ताबडतोब काढून टाकण्याची विनंती केली
आहे. त्यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा
आहे, पण जर त्यांनी तसे केले नाही तर पुढे कोणती उपाययोजना करता
येण्यासारखी आहे ?