कथा : अलार्म भाग १

कथा : अलार्म भाग १

त्याची झोपण्याची वेळ त्याची त्यालाच कधी कळली नाही. रात्र नसती तर तो कदाचित झोपलाही नसता किंवा तसा त्यांनी प्रयत्नही केला नसता. त्याला न आवडणारे त्याचे काही मित्र त्याला पागल म्हणायचे का?   हे त्यांनाच माहीत. कदाचित जीवन कसं जगायचं वा जीवन जगण्याचा अर्थ त्यांना समाजाला होता की याला हा प्रश्नच आहे.

त्याला कधी कधी वाटायचं यांना मित्र म्हणावं की यांना दुसरं काही नाव द्यावं. त्यांना शत्रू म्हणता येत नाही. पण दुसरं कोणत नाव देणार? असो. जीवन, त्याचा अर्थ व ते कसं जगायच हा प्रश्न अनंत काळापासून आहे व कदाचित सृष्टीच्या अंतापर्यंत राहीलं. जीवन जगणं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण हे जीवन, त्यातील जीव हा फक्त परमेश्वरचा असतो. माध्यम असतात आई वडील. काही लोकांच्या नजरेत याचा अर्थ कदाचित वेगळा होतो. त्याला वाटायचं असे घाणेरडे व अश्लिल विचार का करतात. पण लगेच त्याचा मनाला एक प्रश्न हळूच स्पर्श करून जायचा तो म्हणजे जसे चांगले विचार करणारे आहेत तसेच वाईट विचार करणारे आहेत. त्यांचं प्रमाण जास्त आहे. इतकच. लगेच त्याच्या मनात परत दूसरा विचार यायचा, त्याच बरोबर त्या शरीरात मरेपर्यंत वास्तव करणारा आत्मा एकदा शरीरातून गेला की शरीर हे एका पुतळ्यासारख असतं. त्या शरीरावर मेल्यानंतर धार्मिक विधी करतो हे त्याला कळत देखील नाही. (क्रमश)