मुगाच्या डाळीचा डोसा !!!

  • मूगाची डाळ २ वाट्या
  • ३/४ पाकळ्या लसुण
  • ४-५ हिरव्या मिरच्या,
  • छोटा तुकडा आलं
  • तेल
  • हळद
  • चवीपुरते मीठ
१५ मिनिटे
३-४
  1. मुगाची डाळ २ वाट्या ४ तास भिजत घालणे.
  2. भिजलेली मुगाची डाळ मिक्सरला बारीक वाटून घेणे.
  3. त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आले, लसूण (पाट्यावर वाटल्या की अजून चव येते) आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
  4. चवीपुरते मीठ आणि एक चमचा हळद घाला.
  5. तव्यावर १ चमचा तेल घाला आणि पळीने एकसारखे मुगाच्या डाळीचे पीठ पसरवा.
  6. झाकणी घालून डोशाला २ मिं.नि वाफ आणावी.
  7. एका बाजूने डोसा आला की परतवून घेणे.

डोसा तुमच्या आवडीप्रमाणे चटणी बरोबर किंवा केचप बरोबर खायला द्या.

बारीक केलेली मुगाची डाळ ७-८ तास राहू शकते. (फ्रीजमध्ये)

सौ. आई आणि रुचिरा