गोल्ड इटीएफ- सोन्याचा म्युच्युअल फंड भाग २

जगाच्या आर्थिक व्यवहारात असलेली अस्थिरता व भारतीय रुपयाच्या किंगतीत
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत होत असलेली घसरण, यामुळे सोन्याच्या किंगती नवीन
उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे अर्थात गोल्ड इटीएफमधे पैसे गुंतवत असलेल्या
गुंतवणूकीदाराना चांगलाच फायदा होत आहे. मागील महिन्यात गोल्ड इटीएफच्या
किंगतीत साधारणपणे ९% वाढ झाली आहे. त्यामुळे भाववाढीवर मात करण्यात याचा
उपयोग होत आहे कारण याच सुमारास सेंसेक्समधे साधारण ५.६% येवढी घट झाली
आहे. तसेच शेअर बाजारात चढ्उतारही फार प्रमाणात होत आहे, यासर्वांमुळे
गोल्ड इटीएफच्या गुंतवणूकीचे महत्व शेअर्सच्या गुंतवणूकीएवढेच किंबहूना
जास्तच वाढत आहे.
गोल्ड इटीएफच्या सुरवातीपासून म्हणजे साधारण २००७ सालापासून या संपत्तीच्या
वर्गीकरणाचे महत्व वाढत आहे कारण अजूनपर्यत वार्षिक सरासरी २७%(सीएजीआर)
एवढी वाढ मागच्या तीन वर्षात झाली आहे. याच्या तुलनेत सेंसेक्समधे फक्त ४%
एवढीच सरासरी वार्षिक वाढ झाली आहे.
एक्वीटी व सोने यांचे जे एक नकारात्मक गणित होते(निगेटिव कोरिलेशन) त्यात
जो फरक कमी होत होता तो आता परत वाढत आहे. याचा अर्थ एकच की सोन्याची मागणी
फार झपाट्याने वाढत आहे. सध्याच्या युरोपियन डेटच्या संकटाने जो जागतिक
गुंतवणूकीदारांच्या विश्वासात घट झाली त्यामुळे सोन्याच्या मागणीत व
त्यामुळे किंमतीत आणखीनच वाढ झाली.
गोल्ड इटीएफच्या म्युच्युअल फंडांच्या एकूण गुंतवणूकीच्या वाढीनेही(अयुम)
ही परिस्थिती लक्षात येते. तसेच गोल्ड इटीएफच्या वाढत्या
गुंतवणूकीदारांच्या संख्येने हे आणखीनच स्पष्ट होते. बेंचमार्क म्युच्युअल
फंड ज्यानी गोल्ड इटीएफची भारतात सुरवात केली त्यांच्या गुंतवणूकीदाराच्या
संख्येत मागच्या ऑगष्टपासून दुप्प्ट वाढ झाली आहे.
या गोल्ड इटीएफच्या वाढत्या लोकप्रियतेने इतर म्युच्युअल फंड्सना गोल्ड
इटीएफ सुरु करण्यासाठी आणखीनच जोर आला आहे. एसबीआय म्युच्यअल फंड मागच्या
सप्टेंबरमधे गोल्ड इटीएफ सुरु केल्यानंतर रेलिगेअरनीही त्याच्या संख्येत भर
घालून, या गोल्ड इटीएफची संख्या आता आठ झाली आहे.
जर जगाच्या आर्थिक परिस्थितीत अशीच अस्थिरता काही काळासाठी राहिली व शेअर
बाजारात असाच चढउतार(व्होलॅटिलीटी) राहिला तर गोल्ड इटीएफच्या
गुंतवणूकीदारांची संख्या तर वाढेलच पण अधिक अधिक म्युच्युअल फंडस गोल्ड
इटीएफ सुरू करतील
असे झाले तर सोने एक गुंतवणूकीचे माध्यम मधून जास्त लोकप्रिय होईल.
हा गुंतवणूकीचा सल्ला नाही तर दिलेली फक्त माहिती आहे.
चूकभूल द्यावी घ्यावी.