पुन्हा एकदा पाऊस चालू झाला..
मनाला कसलीतरी अनामिक हुरहुर लावून गेला
वाटते सगळे व्यर्थ आता
का आहेस तू लांब असा..
अंतर इतके वाढले की
कधी परत मिटणार च नाही
तुझा हात माझ्या हाती
सांग ना कधी येणार च नाही?..
आठवते तुला पावसातले आपले भिजणे
चिंब भिजून थंडीत गप्पा मारत coffee पिणे
मग उगाच चिडवून एकमेकाना नंतर
तास न तास हसत राहणे..
दिवस ते येतील का रे परत
माझा तू होशील का रे सहज
पावसाळा मला मागचा च हवा
तुझ्यासवे भिजायला फक्त एकदाच..