मॅगी नुडल्स चे थालीपीठ

  • मसाला मॅगी नुडल्स १ पाकिट...तुमच्या आवडिचा फ़्लेवर घेतला तरि चालेल..चालेल काय पळेल.
  • १ मध्यम आकाराचा कान्दा चिरुन, १ हिरवी मिरची चे बारीक तुकडे, टोमॅटो १ बारीक चिरुन
  • पुदिना उपलब्ध असल्यास ५ ते ६ पाने तोडुन.
  • तिखट आवडीप्रमाणे, आल लसूण पेस्ट १/२ चमचा
  • तेल आवश्यकते नुसार
  • कोथिम्बिर चिरलेली पाव वाटि.
  • बेसन पिठ आवश्यक्ते नुसार, १ टे स्पुन. तान्दळाचे पिठ..
  • मीठ चविनुसार
१५ मिनिटे

सर्वप्रथम मॅगी नुडल्स पाकिटावर दिलेल्या माहिती नुसार शिजवून घ्या. थंड करा. थंड झाल्यावर त्यात  चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची, पुदिना, आल लसुण पेस्ट, कोथिंबिर, बेसन पिठ मावेल एवढे घाला. तांदळाचे पिठ घाला. आता तिखट मीठ तयार घोल चाखून मग आवश्यक्ते नुसारच घाला..मिश्रण घट्ट झाले अस वाटल्यास थोडे पाणी घालून मिक्स करा....तव्यावर पसरेल इतपतच पातळ करा... आता काय नोनस्टिक पॅन वर जरासे तेल सोडून त्यावर हे मिश्रण पसरवा ... दोनही बाजुनी खरपुस भाजा.. ४ ते ५ थालिपीठे होतील.

मस्त ताव मारा् .....

 हवे असल्यास.... ऊकडलेले मटार, सिमला मिरचि घालू शकाल. हिरवी चटणी, किवा टोमॅटो सॉस बरोबर मस्त लागते.. ̮लहान मुले आवडीने खातात.

असेच मनात आले आणि मी केले.