अंड्याची सुकी भाजी

  • ६ अन्डि, २ कान्दे उभे चिरुन, टोमॅटो २ उभे चिरुन
  • लसुण पाकळी २ दुखवून, कोथिम्बिर चिरलेली
  • कान्दा लसुण मसाला २ चमचे,
  • हळद, हिन्ग, जिरे फोडणी साठी
  • मीठ चविनुसार
  • चीज १ वडि किसलेली
  • तेल आवश्यक्ते नुसार
१५ मिनिटे

सर्वप्रथम अंडी उकडून घ्या. अंडी उकडताना पाण्यात मीठ व चमचाभर तेल टाकण्यास विसरू नका(साले चटकन निघतात). पाणी उकळायला लागल्यावर घड्याळात मोजून ८ ते १० मिनिटे अंडी उकडावि.लगेचच गरम पाणी ओतून गार पाणी त्यात ओतावे. आता अंडी सोलून घ्या.

मधोमध काप द्या. बाजुला ठेवा.
आता पॅन मध्ये तेल गरम करा. त्यात जिरे तडतडवा मग किंचित हिंग, लसुण व शेवटी कांदा टाकून जरा वेळ परता. मग टोमॅटो टाकून परता. आता हळद घाला थोडिशी कोथिंबिर घालून मस्त परता. एक वाफ आणली तरी चालेल. आता कांदा लसुण मसाला घालून जरा वेळ हलवा . मिठ घाला बेतानेच. आता १ अंडे मस्त कुस्करून त्यात मिक्स करा. बाकी अंडी नाजुक हाताने घालून अलगदच हलवा जेणे करून मसाला अन्ड्यान्वर लागेल. आता जास्त हलवू नका नाहितर अंडी विस्कटतील. गॅस बंद करून वरून चिज कोथिंबिर पेरा आणि गरमा गरम सर्व करा...:D

हि भाजी चटकन होते.. ब्रेड, चपाती बरोबर मस्त लागते..... प्रविण चा कांदा लसुण मसाला चागला आहे. ̱

जास्त तिखट हवे असल्यास हिर्वी मिरची फोडणीला टाकू शकता.
आई