गुजराथी कढी

  • दहि ५०० ग्रम
  • आल, कडीपत्ता, हिरवि मिर्चि चा ठेचा.
  • बेसन पिठ २ ते ३ चमचे.,
  • फोडणी : मेथि दाणे ४, मोहरी, हिन्ग, मिरे, दालचिनि तुकडा १, लवन्ग १, लाल मिर्चि २
  • साखर किवा गुळ चविनुसार
  • मिठ चविनुसार
५ मिनिटे

दही मस्त फेटून घ्या. त्यात आल मिरची कडिपत्याचा ठेचा , मिठ, साखर मिक्स करा .. त्याला बेसन पिठ पण लावा व पाणी घालून ताक करून घ्या. आता हे मिश्रण. उंच पातेल्यात उकळी येईस तो पर्यंत तापवा...तापविताना एकसारख हलवत मात्र रहा.. ऊकळी आल्यावर गॅस मंद करून हलवत रहा.... हलविणे बंद केले तर ति फुटण्याची शक्यता असते...

दुसरी कडे पॅन मध्ये साजुक तुप तापल्यावर. मोहरी तडतड्वा मग क्रमाक्रमाने मेथी दाणे, हिंग, मिरे, दालचिनि, लवंग, आणि शेवटी लाल मिर्चि.... टाका.
हि फोडणी तयार कढी मध्ये टाकून ५ सेकंद झाकन लावा लगेचच हलवून एक उकळी आणून .... भाता बरोबर वाढा.

हवी असल्यास हळद घालू शकता. गुजराथ मध्ये पांढरिच कढी करतात.