काकडी पोहे

  • शक्य तो बासमती तान्द्ळाचे पोहे ५ मुठि
  • काकडी २ चौकोनि बारिक चिरुन
  • तिखट, मिठ, साखर चविनुसार
  • हिरवि मिर्चिचे बारिक तुकडे, हळद
  • आखे धणे २ चमचे खलबत्यात ओबड धोबड खरडुन.
  • कडिपत्ता, मोहरि, जिरे.
  • काथिम्बिर
  • १ लिम्बुरस
  • तेल २ पळ्या
१५ मिनिटे

चांगल्या प्रतीच्या दुकानात जाउन बासमती तान्दळाचे पाहे मागावे. घरी आणून रोळी मध्ये घेउन पाणी ने भिजवावे. बाजुला ठेवावे. तो पर्यंत बाकिची तय्यारी करून घ्यावि. भिजलेल्या पोहे मध्ये साखर मीठ हळद मिक्स करावि. 

आता कडईत तेल गर्म करून त्यात मोहरी तडतड्वा. मग जिरे, मिर्च्या, अर्धवट कुटलेले धणे टाका, मग कडिपत्ता , काकडी टाकून २ मिनिटे परतून घ्या. मग लाल तिखट तुमच्या आवडी प्रमाणे कमी जास्त घाला.  आता वेळ झाली पाहे मिक्स करायची. पोहे घालून जरा वर खाली करुन. एक्च वाफ आणा. जास्त वेळ परतत बसू नका नाही तर पोह्यांचा मऊपणा कमी होतो. शेवटी गॅस बंद करून लिंबुरस व कोथिंबिर टाकून परत खाली वर करा.
गर्म गरम पोहे थन्ड दहि बरोबर सर्व करा. नुस्ते खाल्ले तरी ओके.

१) काकडी दाताखाली येते तेव्हा मस्त लागते.

२) मटार , भेंडि, सिमला मिर्चि, कांदा वापरून पोहे करावे सेम पद्ध्त. फक्त तिखट न घालताच करावे.