इनवर्टर वापरताना..... भाग १

आजच्या वीज कपातीच्या काळात इनवर्टर आवश्यक वस्तू बनली आहे पण अयोग्य रीतीने वापर झाल्यास त्याची गत असून अडचन .... अशी होते. म्हणून इन्वर्टरचा योग्य रीतीने वापर कसा करावा या विषयी थोडीशी माहीती येथे देत आहे आशा आहे कि वाचकाना ती उपयोगी पडेल

इन्वर्टर ची जागा:

अनेक ठिकाणी इन्वर्टर  अडगळीच्या जागी ठेवलेला असतो उदाः लेंटलवर किवा जिन्याखाली.ह्या जागा चुकीच्या आहेत इन्वर्टर कधीही बॅटरी च्या वर ठेवू नये तो मोकळ्या हवेशीर जागेत बॅटरी च्या बाजुला साधारण्तः ३ ते ५ फुटावर ठेवावा कारण बॅटरी चार्जींग होते वेळेस तयार होणारा गॅस (So2) गंजकारक असतो हा गॅस इन्वर्टरचे आतील भाग खराब करतो

बॅटरी

बॅटरी जोडताना तिच्या दोन्ही टर्मिनल ना व वायरच्या उघड्या भागाला पेट्रोलियम जेली(व्हॅसलीन) किवा ग्रीस लावावे

दर ८ दिवसानि पाण्याची पातळी तपासावी आवश्यकता असल्यास डिस्टिल्ड वाटर भरावे

चार्जींग चालू असताना हात लावून बॅटरी चा एखादा भाग किवा पुर्ण बॅटरी गरम तर होत नाही हे पाहावे

आणखी माहीती पुढील भागात.........