आयरलिक्युअर कुखन- एगलिक्युअर केक

  • २५० ग्राम पिठीसाखर
  • ५ अंडी
  • २ चमचे वॅनिला अर्क
  • १/४ लिटर आयर लिक्युअर (एग लिक्युअर)
  • १/४ लिटर तेल अथवा बटर
  • १२५ ग्राम मैदा
  • १२५ ग्राम आरारुट अथवा पोटॅटो स्टार्च
  • ४ चहाचे चमचे बेकिंग पावडर
  • चिमूटभर मीठ
२ तास
आयरलिक्युअर कुखन- एगलिक्युअर केक


Photos_035

पीठीसाखर, अंडी, वॅनिला अर्क एकत्र करणे व भरपूर फेटणे. त्या मिश्रणात २५० मिली एग लिक्युअर, २५० मिली तेल किवा २५० ग्राम बटर पातळ करून घालणे व हलक्या हाताने फेटणे.
मैदा+ बेकिंग पावडर+ पोटॅटो स्टार्च एकत्र करणे, त्यात चिमूटभर मीठ घालणे व हे एकत्र करून वरील मिश्रणात घालणे.
१७५ अंश से. वर ३० मिनिटे बेक करणे व नंतर १५० अंश से वर २५ ते ३० मिनिटे बेक करणे.
विणायची सुई किवा सुरी केकच्या पोटात खूपसून पाहणे जर मिश्रण चिकटले नाही तर केक झाला आहे असे समजावे.
केक झाला असला तरीही ३/४ मिनिटे तो अवनमध्येच राहू देणे.
नंतर जाळीवर काढून घेणे व गार झाल्यावर तुकडे करणे.


Photos_034

आमच्या मार्लिसकाकू हानोफरच्या, त्यांच्याकडे कॉफीला गेलो असताना त्यांनी हा फर्मास केक केला होता. इतका अलवार केक होता की लग्गेच त्यांच्याकडून पाकृ घेतली आणि घरी आल्यावर प्रात्यक्षिके झालीच.
मी बटर वापरले परंतु मार्लिसकाकूंनी तेल वापरून केलेला केकही अप्रतिम होता.

मार्लिस काकू