शाही मटार ऊसळ

  • वाटणसाठी :
  • मुठभर खसखस (गरम पाण्यात भिजवावी म्हणजे बारीक वाटली जाते. )
  • १० ग्रॆम चारोळे
  • १२ बदाम
  • १० वेलदोडे
  • अर्धी जुडी कोथिंबीर चिरलेली
  • १० हिरव्या मिरच्या (तिखट कमी हवे असेल तर कमी घाला.)
  • १० लसुण पाकळ्या
  • आलं १/२ इंच
  • १/२ चमचा जिरे, १ चमचा धणे , २ मोठे चिरलेले कांदे
  • फ़ोडणी साठि : १ लसणीची गड्डि सोलुन आख्या पाकळ्या.
  • बाकिचे साहित्य : मटार १/२ किलो
  • एका नारळाचे दुध
  • साजुक तुप आवश्यकते नुसार
  • गरम पाणी
  • मिठ चवीनुसार
३० मिनिटे
५ ते ६
  1. वरील वाटणासाठी दिलेले साहित्य मिक्सर मध्ये बारिक वाटुन घ्या. (फ़ाईन पेस्ट) करा.
  2. कडईत तुप तापल्यावर आख्या लसुण पाकळ्यांची फ़ोड्णी करा. 
  3. मग मटार टाकुन जरा वेळ परता. 
  4. आता वाटलेला मसाला घालून ३ ते ४ मिनिटे परता.
  5. आता गरजेनूसार मीठ व गरम पाणी घालुन उकळी आल्यावर मंद आचेवर शिजवा तुप वरती दिसे पर्यन्त.
  6. अधुन मधुन खालि वर करा जेणे करुन मसाला खाली लागणार नाही.
  7. शेवटी नारळाचे दुध घाला. मंद जाळावर शिजु द्या. तुप वरती तरंगायला लागले की जाळावरुन काढून लिंबाचा रस पिळा. 
  8. पोपटि रंगाची उसळ तय्यार. 
ब्रेड बरोबर ताव मारा सुरेख लागते.. भाता बरोबर हि चालेल.
  1.  फ़्रोजन मटार वापरु शकता. 
  2.  नोनव्हेज लवर्स मटार ऐवजी सारंगा म्हणजेच पॉपलेट मासे वापरुन हि उसळ करु शकता. एकदम फ़क्कड लागते. मासे लिंबु व मिठ लाउन    मॅरिनेट करा १५ मिनिटे.  आणि मटारच्या जागी मासे सोडा मसाल्यात. मासे ७ ते ८ मिनिटात शिजतात. त्यामुळे मासे उशिरा सोडा  मसाल्यात नारळाचे दुध टाकण्याआधि.
  3.  पार्टि साठी हा मेनु उत्तम आहे. शाही मसालेदार ग्रेवि ब्रेड बरोबर मस्त लागते त्या मुळे पोळ्य़ा लाटायचे कष्ट व वेळ वाचतो. खाणारे मंडळी  पण खुश होतात. :)
  4.  तुमच्या होणारे जावयाला तर हि उसळ खायला घालाच. 
  5.  जरुर करुन पहा. आणि अभिप्राय कळवा.
माझि माय ......आई