आवाहन - मनोगत दीपावली २०१०

नमस्कार मंडळी,

जुलै महिना संपत आला आहे. आता दिवाळी अंकाच्या तयारीस सुरुवात करायला हवी.

मनोगताच्या २०१० च्या  दीपावली अंकाच्या निर्मितीस हातभार लावण्याची इच्छा असणार्‍या सदस्यांनी कृपया दिवाळीमनोगत ह्यांना  व्यक्तिगत निरोप लिहावा आणि त्यात आपण कोणत्या स्वरूपाचे साहाय्य करू इच्छिता हे नमूद करावे. कामाची विभागणी साधारण खालीलप्रमाणे असेल :

  • तांत्रिक
    - ड्रूपल, HTML, वेब डिझाइनिंग/टेस्टिंग/पब्लिशिंग, ग्राफिक्स
  • मुद्रितशोधन, शुद्धलेखन तपासणे इत्यादी
  • संपादन साहाय्य
  • पडद्यामागील सुसूत्रता, फाईल मॅनेजमेन्ट, विरोप-पत्रव्यवहार, समिती सदस्यांतील, व समिती व लेखकांतील समन्वय इत्यादी

विभागणी काटेकोर नसून सदस्य एकाहून अधिक विभागास हातभार लावू
शकतात. इच्छुक सदस्यांनी कृपया आपले निरोप ३१ जुलैपर्यंत पाठवावे.

लेखकांनी आणि कवींनीही 'मनोगत दीपावली अंक २०१०' साठी  आपले उत्तम लिखाण राखून ठेवावे, ही विनंती.

आपले,
दिवाळीमनोगत