कवितासंग्रह छापण्याबाबत मार्गदर्शन हवे आहे

मला कवितासंग्रह छापण्याबाबत जाणकार लोकांकडून मार्गदर्शन हवे आहे. कवितासंग्रह छापण्यासाठी मला प्रकाशकाची आवश्यकता आहे. कवितासंग्रह छापण्यासाठी सहसा प्रकाशक तयार होत नाहित, असं मी ऐकलं आहे. त्यामुळे माझ्या कवितासंग्रहासाठी होणारा खर्च उचलण्यास मी तयार आहे. याआधीही मी स्वखर्चाने कवितासंग्रह छापला आहे, पण अशा प्रकाशनात वितरणाची अत्यंतिक समस्या जाणवते. म्हणूनच यावेळी मला असा चांगला प्रकाशक हवा आहे, जो लवकरात लवकर पुस्तक छापेल, कागदपत्रांचा (आर्थिक) चांगला व्यवहार करेल (विश्वासू असेल), पुस्तकाचे व्यवस्थित रजिस्ट्रेशन आणि अत्यंतिक उत्तम वितरण करेल. म्हणजे थोडक्यात मला असा प्रकाशक हवा आहे ज्याचे काम दर्जेदार आणि विश्वासार्ह असेल. याबाबतीत मी सुरुवातीला ‘ग्रंथायन’ चा विचार केला होता, पण आता त्यांची वेबसाईटच उघडली जात नाहीये. त्या वेबसाईटवर त्यांनी याबाबत माहिती दिली होती. ग्रंथायनचे ऑफिस पुण्यात आहे का!? प्रकाशक शक्यतो पुण्यातला असावा. तरी याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कृपया मला मार्गदर्शन करावे. तुमच्या प्रतिसादाची अतुरतेने वाट पहात आहे.