जीवनाच्या ज्योतीची तेवनशक्ती आज संपली
गुरुवर विश्वास ठेवण्याची रीतच आज संपली
अवेळी झाल्या पानगळीने झाडे भकास झाली
निलाजऱ्या नग्न जंगलाची सभ्यता आज संपली
शोभा तुळशीची अन घरात धनझाडे शोभेची
धनदौलतीच्या मोहात शालीनता आज संपली
जळू बांडगुळांनी रक्त प्याबयास सुरुवात केली
प्रेम आपुलकीच्या बाण्याची वस्तीच आज संपली
विचारांच्या पाचोळ्यामुळे मनाची कुंडी झाली
निर्माल्याचा मान ठेवण्याची रीतच आज संपली
फुंकरीने हलक्या धग वणव्याची जोरात भडकली
वात्सल्यपुर्ण वेदनाशामक फुंकर आज संपली
पानाफांदीच्या नकळत कीड साऱ्या फळात शिरली
आश्रय देण्याची ऊंबराची ईच्छा आज संपली