खेळायचे वय संपले की पळायचे सुरू होई
पळता -पळता थकल्यावर रडायचे आयतेच येई
आई-बाबा, दादा-ताई रक्ताचे नाते विणत जाई
नाती ओली असताना सुरू होते लग्नाची घाई
लगीन-बिगीन झाल्यावर आकाश दोन बोट राही
बायको म्हणेल ते व तसचं नाचणं अंगात येई
सुखामागे धावता धावता माणूसपण विसरून जाई
दया, माया, धर्माला त्याच्या लेखी किंमत नाही
पै पै जुळ्वताना पोटाला चिमटा देत राही
बचतीच्या नावाखाली कंजुशीचा कहर होई
मिळेल त्या वाटेवरून सर्वात पुठे जाण्याची घाई
भलं-बुर काहीच न बघता सगळच ओरबाडत राही
कन्हत कुथत, लाचार बनत कुत्र्यासारखा भटकत राही
शुल्लक स्वार्थासाठी स्वाभिमान-स्वत्व विसरून जाई