तांदळाची पेज, तीही, न प्याया

लग्न माझे, गाव लागे, सजाया

सोडती ना, साथ माझी, चुका या

नित्य वाया अक्षतांचा ढिगारा

तांदळाची पेज, तीही, न प्याया

माजलेल्या रोपट्यांच्या जगी या

लागले ते का मलाही खुडाया?

कर्जफेडाया जगावे कशाला

रोज धोंड्याची उशी ती निजाया

 

ह्या मढ्यांचा रोज वाढे पसारा

का यमासी वेळ नाही निजाया?

जन्म हा तो लाभला मानवाचा

कोणताही मार्ग नाही सुटाया