पूर्वीच्या चाळीचे आधुनिक रूप
हाऊसींग सोसायटीच्या नावाने मिरवतो खूप
चाळीमधील सगळ्या बिऱ्हाडांचे असे एक कुटुंब
सोसायटीतल्या प्रत्येक खोलीत आहे एक कुटुंब
नळावारी चाले भांडण तुंबळ
पण घरा घरा नांदे आनंदी पवन
गज आहेत सोसायटीच्या बाल्कनीत अन दुरावा एकमेकांत
असते उंची सोसायटीची भरमसाठ
त्याचबरोबर वाढत आहे अहंकार माणसात
चाळ गेली गेले चाळीतले ओलावे
त्याजागी उभे राहिले तुरुंग नवे
--अक्षय