पर्यटण - अमृतसर वाघासीमा (पंजाब)

ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला आल्यामुळे मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शनिवार रविवार अमृतसरला जाण्याचा बेत आखला. जवळपासची आणखीन काही ठिकाणे पाहता येतील का त्याअनुशंघाने आम्ही इंटरनेटवर माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. भरताच्या उत्तर-पश्चिमेस दिल्लीपासून साधारणात ५४४ कि. मी अंतरावर तर मुंबईपासून १७१२ कि. मी अंतरावर अमृतसर आहे. माझ्या पंजाबी सहकाऱ्यानं कडून हवामानाची चौकशी केली असत सध्या तिथे हवामान उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे झुकत असल्याचे कळले. मी हॉटेल व रेल्वेच्या वातानुकूलित डब्यात आरक्षण करण्याचे ठरवले. दिल्लीहून अमृतसरकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहे एक सहारनपुरहून जातो तर दुसरा पानिपताहून. जातानाचा मार्ग सहारनपुरहून होता. आम्ही मुंबई ते अमृतसर या रेल्वेचे आरक्षण केले. हि रेल्वे संध्याकाळी ७. ०० दिल्लीत येते व दुसऱ्या दिवशी सकाळी ५. २० वा अमृतसरला पोचते.
शुकवार होता त्यादिवशी आम्ही ऑफिसमधून जरा लवकरच निघाले दिल्लीमधल्या ट्रॅफिक जामचा आम्हाला चांगलाच अनुभव असल्यामुळे कोणताही धोका न पत्करता आम्ही गाडी लवकरच बोलवली होती. साधारणता ६. ३० वा. हजरतनिजमुद्दीन स्थानकावर पोहोचलो. मला वाटतंय हे भारतातले सगळ्यात घाणेरडे रेल्वे स्थानक असावे. कसातरी अर्धा तास काढल्यावर बरोबर ७. ०० वा गोल्डन टेंपल एक्सप्रेस स्थानकात दाखल झाली. आम्ही आपापल्या जागा पटकावून रेल्वे निघण्याची वाटपाहू लागलो. बरोबर ७. १५ वा रेल्वेने हजरतनिजमुद्दीन स्थानक सोडलं आणि आम्हाला जरा हायसं वाटलं.
गाडीने जसे गझियाबाद सोडल तसे आमच्या डब्यात दोन पोलिस चढले व त्यांनी डब्याचा दरवाजा उघडू नये त्याच्याप्रमाणे दरवाजात उभे न राहण्याच्या सर्वांना सुचना दिल्या. जरा विचारपूस केल्यावर त्याभागात लुटण्यासाठी चालत्या रेल्वे मधून खाली ओढण्याचे बरेच प्रकार घडतात असे कळाले आणि हे प्रकार पुढे सहारनपुर पर्यंत चालतात. थोडा वेळ गप्पा मारून बरोबर सकाळी ५. ०० वा. चा गजर लावून आम्ही झोपणेच पसंत केले.
सकाळी बरोबर ५. ०० वा. जाग आली फ्रेश झालो आणि दरवाजात आलो पाहतो तर काय नजर जाईल तिकडे नुकतीच लागवड केलेली भात शेती दिसत होती. मध्ये मध्ये काढायला थोडा उशीर झालेले गव्हाचे ताटवे दिसत होते. पंजाब हे शेतीमध्ये नंबर एकचे राज्या आहे हे जे ऐकत होतो त्याची प्रचीती बाहेरचे दृश्य पाहून यायला वेळ लागला नाही. पाहावे तिकडे दूरवर पसरलेली हिरवीगार शेते.
हॉटेल मधला ड्रायव्हर आम्हाला न्यायला आला होता. खात्री पटवून घेत्यावर आम्ही त्याच्या गाडीत बसून हॉटेलवर आलो. दोन तास झोप काढून ताजेतवाने होऊन बाहेर पडलो. याआधी हॉटेलमध्ये जालियनवाला बाग आणि आणि सुवर्ण मंदिर कुठे आहे आणि नाश्त्याची उत्तम सोय कोठे होईल याची चौकशी केली. जालियनवाला बाग आणि आणि सुवर्ण मंदिर हि दोन ठिकाणे जवळच आहेत आणि बागे कडून सुवर्ण मंदिराकडे जाताना मध्ये हॉटेल्स आहेत तिथे आम्ही नाश्ता करण्याचे ठरवले. आम्ही रिक्शा पकडली आणि १० मि जालियनवाला बागेजवळ पोहोचलो. अमृतसर हे शहर तसे जस्त मोठे नाहीये रिक्शाने तुम्ही शहर फिरू शकता. आणि या शहरात आल्यावर याच एक वेगळपण जाणवत, वाटत की आपण भारत पाकिस्तान सीमे जवळ आलोय. हा एक गोष्ट सांगायची राहून गेल आजही अमृतसरमध्ये जुन्या खेकडा पद्धतीच्या रिक्षा आहेत (गदर चित्रपटात आहे)
आम्ही तिथेच एक चांगले हॉटेल बघून घुसलो आधीच ठरवलं होतो.. अमृतसरी कुलचा, छोले आणि गोड लस्सीची ऑर्डर दिली. आमच्या बरोबर एक दाक्षिणात्य महाभाग होता तो इडली सांबार शोधायला लागला, मला अस अजिबात आवडत नाही माणसाने जिकडे जाईल तिकडेच होऊन जावे आपण थोडेच कायमचे आलेलो असतो. तिथल्या रंगात रंगून जाव. मी बरीच माणसे पाहिली ते फक्त ठिकाणे पाहायला जातात एंजॉय करायला जात नाहीत, फक्त ठिकाणेच पाहायची असतील, फोटो काढायचे असतील तर टीव्हीवर बरेच चॅनेल्स आहेत, इंटरनेटवर फोटो उपलब्ध आहेत.... जयाचं कशाला..? त्याला हे ऐकवल्या वर मग त्यानेही तिच ऑर्डर दिली. थोड्याच वेळात वेटर मस्त अम्रुतस्ररी कुलचा, छोले घेऊन आला आणि त्यापाठोपाठ हातभर लांब लस्सीचा ग्लास. आ हा हा... त्या लुसलुशीत अमृतसरी कुलचा खाण्याची एक वेगळीच मजा होती... हा अमृतसरी कुलचा मैद्यापासून बनवतात आणि त्यात एकदम हलकासा पनीर किंवा बटाट्याचा थर असतो आणि लस्सीच स्तुती करवी तेवढी कमी.. मस्त मलईचा गोळा त्यावर तरंगत होता.. आऽ हाऽ हाऽ ऽऽ. या सगळ्याचा समाचार घेतला आणि आम्ही आमचा मोर्चा जालियनवाला बागेकडे वळवला...
जालियनवाला बागे समोर आलो आणि मनात थोडा कालवल्या सारखा झालं, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये १९१९ साली याच ठिकाणी रौलेट ऑक्टच्या विरोधात आवाज उठवणाऱ्य हजारो लोकांचे प्राण जनरल डारने घेतले होते त्या जालियन बागे समोर आम्ही उभे होतो. एकल्या प्रमाणे आतामध्ये जाण्यास दोन भिंतीच्यामध्ये एक अरुंद वाट आहे आपण त्याला मराठीत बोळ म्हणतो. अस म्हणतात की डायरने आपल्याबरोबर गाडी भरून रायफल्स आणि ऑमुनेशन आणले होत्या परंतु या अरुंद वाटेमुळे त्याला ती गाडी आत नेता आली नाही आणि आतमध्येही त्याने जोपर्यंत गोळ्या संपत नाहीत तो पर्यंत गोळीबार केला होता. आत मध्ये जाऊन पाहिल्यावर लक्षात आलं की पूर्वीच्या बागेला आता एक स्मारकाचे रूप देण्यात आले आहे. आतमध्ये गेल्यावर डाव्या बाजूला एक छोटासा दालन आहे त्यामध्ये शहीद झालेल्यांचे फोटो लावण्यात आले आहेत तर उजव्या बाजूला एक मशाल जळत असते. बागेतील मधल्या वाटेने पुढे गेल्यावर एक मंदिरा सारख छोट ठिकाण आहे त्याच्या तिन्हीबाजुला भिंतीच्या कमानी आहेत, आजही आपल्याला त्यावर गोळ्यांच्या ३० खुना दिसतात आणि बागेमध्ये इतरत्र फिरताना आशा खुणा आपणास सरास पाहवयास मिळतात. त्याच्याच मागे एक मोठ स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारका समोर उभे राहून डाव्या बाजूला गेल्यास आपल्याला एक विहीर पाहवयास मिळते. गोळीबाराच्या वेळी जीव वाचवण्यासाठी शेकडो लोकांनी या विहिरीत उड्या मारल्या आणि प्राण गमावले होते. एकंदर त्यावेळेची परिस्थीती काय असेल याच अंदाज येतो. जालियनवाला बाग पाहायला साधारणता ३० ते ४५ मि लागतात.
जालियन बागेतून बाहेर आल्यावर डावीकडे चालण्याच्या अंतरावर सुवर्णमंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच बाजूला एक मोठ वाहनतळ आहे आणि पाहिल्यावर एकंदर कल्पना येते की इथे भक्ताची चांगली व्यवस्था केली जाते. हा एक.. डोक्याला काहीतरी बांधल्याशिवाय आत मध्ये प्रवेश नाही आणि आतमध्ये याची चोख अंमलबजावनी केली जाते. माझ्या पाहण्यातला एक किस्सा सांगतो, एका होरोने मंदिरा समोर उभे राहून डोक्याला बांधलेला रुमाल काढून फोटो काढला आणि नेमक तिथल्या एका स्वंसेवकाने ते पाहील तो पळतच आला आणि पहिला त्याचा कॉमेरा काढून घेतला आणि ऑफिसमध्ये जमा केला. नंतर खूप विनवण्या केल्यावर काढलेले फोटो वगळण्याच्या बोलीवर तो परत देण्यात आला बरोबर डोक्याच रुमाल परत न उतरवण्याचा सज्जड दम ही भरण्यात आला. मला नाही वाटत नंतर त्याने पंजाब सोडे पर्यंत डोक्याचा रुमाल उतरवला असेल. ह मी स्वंसेवक हा शब्द वापरला, मंदिरामध्ये चप्पल स्टँडपासून मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये काम करणारे सगळे स्वयंसेवक आहेत. प्रतेकजण आपल्याला जमेल ते काम करत असतो. स्त्रिया लंगरमध्ये किंवा पाणपोई मध्ये भांडी धुण्याचे काम करतात तर पुरुष सुरक्षा रक्षकापासून झाडू मारण्या पर्यंत राहिलेली सगळी कामे करतात. ऐकण्यात असही आलंय की एक बॉलीवूड अभिनेत्री आपल्या पापाच परिमार्जत करण्यासाठी इथे एक दिवसभर भांडी घासायला होती.
जसा आम्ही आतमध्ये प्रवेश केला तस आम्हाला त्या अप्रतिम सुवर्णमंदिराचे दर्शन झाले. सूर्याची कोवळी किरणे पडल्यामुळे त्याला कमालीची लखाखी आली होती. साधारणता १००० ते १२०० चौ. मि. चौकोनी तळ्यामध्ये हे मंदिर आहे. त्याच्या चारही बाजूला संगमरवरात मधले बांधकाम आहे. शुभ्र संगमरवरात ते सोन्याचे मंदिर अप्रतिम दिसत होते. मंदिराच्या चारही बाजूने फीरल्यावर आम्ही तिथे प्रसाद घेतला आणि मुख्य मंदिरात प्रवेश केला. शिस्तबद्ध पद्धतीने रंगा लावण्यात आल्या होत्या साधारणता २० मि. आम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश केला. मंदिर दोन मजली आहे. खाली गुरू ग्रंथ साहेब तर वरच्या भागात बसण्यासाठी जागा आहे. आम्ही वर जाऊन थोडावेळ बसून विश्रांती घेतली आणि खाली आलो. खाली आल्यावर दर्शन घेतलेल्यांसाठी मागच्या बाजूने बाहेर जाण्याची जागा आहे व तिथेच लोक तलावातले पाणी तीर्थ म्हणून तोंडात टाकतात. आम्ही पण तीर्थ घेण्यासाठी पाण्यात घातल आणि पाहतो तर काय चाळीस पन्नास नारंगी रंगाचे एक ते दीड फूट लांबीचे गलेलठ्ठ मासे आ वासून खाली पाण्यावर तरंगत होते ते एवढे धटिंगण होते की पानी पिणाऱ्या लोकांचे हात त्यांना लगत होते पण ते जागचे हालत नव्हते. काहीजण त्यांच्या तोंडात बोट सुद्धा घालत होते. ते प्रसाद खाण्यासाठी आले होते आणि साजुक तुपातला प्रसाद खाऊन गलेलठ्ठ झाले होते. आम्ही ही त्यांना थोडा प्रसाद खाऊ घातला आणि बाहेर पडलो. खरं तर मला त्या माशांकडे पाहून हेवा वाटला. नक्कीच त्यांनी गेल्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असावं तेव्हा त्यांना या तळ्यात जन्म मिळाला. फिरून मुख्या दरवाजा पर्यंत आलो पुन्हा एकदा ते सुंदर मंदिर पाहून घेतल आणि बाहेर पडलो.
दुपारचे दोन वाजले होते कडकडून भूक लागली होती. आम्ही आधीच दुपारचे जेवण चांगले कुठे मिळेल याची चौकशी करून ठेवली होती. प्रा दा ढाबा म्हणून एक चांगले हॉटेल आहे. अगदी कोणालाही विचारा सांगतील. मोठ्या भावाल पंजाबी मध्ये प्रा म्हणतात. आम्ही दुपारच्या जेवणातही अमृतसरी कुल्चा घेण्याचे ठरवले पण छोल्याच्या ऐवजी पनीराची भाजी मागवली.... बरोबर लस्सी होतीच.... अप्रतिम.. दोन कुल्चाचा समाचार घेतल्यावर आणि लस्सी प्यायल्यावर आम्ही तृप्त झालो आणि बाहेर पडलो.
साडे पाचच्या आधी वाघा सीमेवर पोहोचायचं होत. अमृतसर पासून वाघा सीमा ३२ कि. मी आहे. जाण्यासाठी रिक्शा किंवा खाजगी वाहने मिळू शकतात ते तुम्हाला घेऊन जातात आणि पुन्हा अमृतसर मध्ये आणून सोडतात. आम्ही हॉटेल मालकाला फोन केला आणि गाडी पाठवायला सांगितलं. जर तुम्ही अमृतसरला जुलैच्या आधी जात असाल तर माझा सल्ला आहे वातानुकूलित वाहनाला पसंती द्या कारण फेब्रुवारी ते जून उत्तर भारतात भयंकर उन्हाळा असतो. गाडी वातानुकूलित होती हे आमचे भाग्य. साधारणता साडेतीन वाजता आम्ही वाघा सीमेकडे प्रस्थान केले. मी पुढची सीट पटकावली होती गाडी शहर सोडून महामार्गावर आली, महामार्ग क्रमांक एक हा रस्ता सरळ लाहोराला जातो आणि याच मार्गावर पुढे आटारी आणि वाघासीमा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवी गार शेते होती तांदळाची नुकतीच पेरणी झालेली दिसत होती मध्ये मध्ये वीटभट्टीच्या भल्यामोठ्या उंचच उंच चिमण्या दिसत होत्या. ड्रायवर बरोबर गप्पा मारत मारता आम्ही आटारीला कधी पोहोचलो कळालच नाही आटारी हे भरतातलं या रस्त्यावरच शेवटच गाव थोड पुढे गेल्यावर आपल्याला भारत पाकिस्तान सीमेचे कुंपण दिसते. गाडी तिथेच सोडावी लागते आणि साधारणता एक किलोमीटर चालत वाघासीमे पर्यंत जावे लागते वाघासीमा हा भाग पाकिस्तानमध्ये आहे. वाघा सीमेवर रोज संध्याकाळी सव्वा सहा वाजत ध्वज उतरवण्याचा कार्यकम होतो. तिथे भारत आणि पाकिस्तानची सेना एकत्र संचलन करताना, एकत्र म्हणजे एकावेळी पण ते त्यांच्या हद्दी मध्ये व भारतीय सेना आपल्या हद्दीत समोरा समोर आणि हा कार्यक्रम फारच देखणा असतो अगदी डोळ्याच पारानं फीटत. तिथ पोहोचल्या पासूनच आपल्याला लष्कराची शिस्त पाहायला मिळते सर्वांना एका रांगेत एक घोडेस्वार शिपाई वाघा सीमे पर्यंत घेऊन गेला वाघासीमे पर्यंत घेऊन गेला तिथे बसण्यासाठी मोठे स्टेडियम आहे पण त्याला छत नाही. तुम्हीजर वेळे आधी पोहोचलात तर तुमचे अतोनात हाल होतात. एक तर ऊन भयंकर अंगातून घामच्या धारा निघत असतात आणि एकदा स्टेडियम मध्ये गेल्यावर ते तुम्हाला बाहेर येऊ देत नाही आणि एकदा बाहेर आलं की परत आत जाऊ देत नाही आणि आपल्यालाही वाटत एवढ लांव आलोय तर कार्यक्रम पाहूनच जावं. पुन्हा एकदा सांगतो जायच असेल तर ऑगस्ट ते फेब्रुवारी या महिन्यातच जावा नाहीतर तुमचे उन्हामुळे अतोनात हाल होणार. साडेपाच पर्यंत स्टेडियम भरून गेल. तरीही लोकांच्या लांबच लांब रांगा वाघासीमे कडे येतच होत्या लोक जिथे जागा मिळेल तिकडे बसत होते. वंंदेमातरम, भारतमाता की जय, हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणांनी सार आसमंत दुमदुमून गेला होता विरुद्ध बाजूने हि घोषना दिल्या जात होत्या. त्या गर्दीकडे पाहून अस वाटत होत की जणू देशभक्तीचा महासागर लोटला आहे. देशभक्तिपर गीते, नाच याने त्याला एक उत्सवाच स्वरूप आल होत. बरोबर सव्वा सहाला कार्यक्रम सुरू झाला. संचलन करताना त्या सीमा सुरक्षा जवानांचा आवेश ते पाक जवानांना देत असलेली खुन्नस बघण्यासारखी होती. त्यामुळे बघणाऱ्यांना आणखीनच जोष येत होता. साधारणता एक तास भर हा कार्यक्रम चालतो आणि नंतर ध्वज खाली घेतला जातो. बरोबर सव्वासातला कार्यक्रम संपला, कार्यक्रम चालू असताना जाणवल नाही पण आता संपूर्ण शरीर आता दुखायला लागल होत खूप थकवा आला होता कशी तरी गाडी शोधली आणि हॉटेलवर पोहोचलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून दुर्गामाता मंदिर पहायला गेलो. हे मंदिर सुद्धा तळ्यामध्येच आहे बघण्यासाठी फार सुंदर असलेले हे मंदिर शहरातच आहे. हे मंदिर सुद्धा पुर्णता संगमरवरात आहे. मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा फारच प्रसन्न आहे. अमृतसरच्याच जवळ रामतीर्थ म्हणून ठिकाण आहे इथेच लव कुशाचा जन्म झाला होता. पण वेळे अभावी जाता आल नाही.
मंदिर पाहून दुपारच जेवण उरकून थोडी विश्रांती घेऊन तीन वाजता आम्ही अमृतसर सोडल आणि पावणे आकराला दिल्लीला पोहोचलो.
एकंदर प्रवास चांगला झाला उत्तर भारतात आलात तर नक्की भेट द्यावे अस ठिकाण आहे.