अपराध देवाच्या हातून तर घडला नसेल?
गाभाऱ्यात म्हणून त्याला कोंडले असेल ।
त्याने कधी वाईट कृत्य तर केले नसेल?
कानीकपाळी म्हणुनच गंध फासले असेल ।
डोके त्याचे सतत तापलेले तर नसेल?
म्हणुनच कदाचित जलाअभिषेक होत असेल।
आरती, विनंती त्याने जुमानली तर नसेल?
भक्तांनी म्हणुनच त्याची किंमत केली असेल ।
माणुस निर्माण करून पस्तावला तर नसेल?
चक्र हाती धरणे म्हणुनच तर सोडले असेल ।
अपेक्षांचे निरांजन जास्त ऊष्ण तर नसेल?
फुलांखाली म्हणुनच तोंड लपवले असेल ।
(सगळ्या देवांची माफी मागून )