भारताला पोखरणारे अळी आहेत चार
आणि आतूनही चाललाय नक्षलांचा थरार
आतातरी अवतार घे हे परमेश्वर
शस्त्रांसाठी चाललीय पैशांची उधळणं
आणि भूधारकांची चाललीय रणकंदन
आतातरी अवतार घे हे परमेश्वर
डोक्यात तिडीक भरते पुढाऱ्यांना बघून
त्यांचा षंढपणा बघून सणक घुसते डोक्यात
आतातरी अवतार घे हे परमेश्वर
भारतमातेची हेळसांड बघून आतडं तुटतंय तीळ-तीळ
आतातरी अवतार घे हे तारणहार.
--अक्षय