मिश्र डाळींची आमटी

  • (१ छोटी वाटिचे प्रमाण)
  • पाव वाटि तुर डाळ
  • अर्धि वाटि मुग डाळ
  • मसुर डाळ छ्टाक भर
  • हरबरा डाळ १ चमचा
  • मेथि दाणे ५ ते ६
  • मद्रासी कांदे २ ते ३ सोलुन आखे
  • आल अर्धा इंच
  • टोमेटो १ मोठय़ा फ़ोडी करुन
  • हळद पाव चमचा, हिंग पाव चमचा.
  • जिरे प्रत्येकी पाव चमचा
  • गुळाचा खडा (आवडीनुसार कमी जास्त)
  • चिंचेचा कोळ २ चमचे.
  • तेल आवश्यकते नुसार
  • गरम पाणी आवश्यकते नुसार
  • फोडणी साठी साहित्य : जिरे, मोहरी, हिन्ग, हळद, कढिलिंबाची पाने
  • हिरवी मिरची २ बारिक कापुन,
  • लसुण ६ पाकळ्या(३ सालासकट तसेच आखे दुखवुन घ्या) बाकिचे बारिक तुकडे करुन
  • गोडा मसाला अर्धा चमचा, तिखट चविनुसार साधारण १/२ चमचा
३० मिनिटे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    1. सर्वप्रथम चारही डाळी पातेल्यात एकत्र करून घ्या त्यात आवश्यकते नुसार पाणी घाला. १५ ते २० मिनिटे भिजू द्यात. 
    2. आता डाळीत चमचा भर तेल, हळद अर्धा चमचा, चुट्किभर हिंग, मेथिदाणे, मद्रासी कांदे, आलं, पाव चमचा जिरे, टोमेटोच्या फोडी घालून कुकर मध्ये १ शिट्टी झाल्यावर मंद जाळावर ८ ते १० मिनिटॅ शिजवून घ्या.  
    3. कुकराचे प्रेशर गेल्यावर डाळ रवीने छान घोटून घ्या. त्यात चिंचेचा कोळ व गूळ घालून बाजूला ठेवा. 
    4. आता वेळ झाली खमंग फोडणीची. पातेल्यात तेल गरम करून मोहरी घालून ती तडतडल्यावर जिरे, हिंग किंचित, मग मिरची, लसूण दोनही कापलेला व सालासकट घाला. लसूण जरासा गुलाबिसर होत आला की लगेच कढीलिंबाची पाने घालून मग गोडा मसाला, तिखट व किंचित हळद घाला.
    5. जरासं हालवून पटकन डाळ व गरम पाणी घाला. छान उकळी येऊ द्या. 


गरम भाता बरोबर वाढा..... हवे असल्यास ओलं खोबरे व कोथिंबीर वरूण घालून खाऊ शकता.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    1. मिश्र डाळी न वापरता कधी फक्त तुरा, मुगाची पण आमटी करता येईल किंवा तुर+ मूगडाळ मिक्स पण करू शकता. चवीत थोडा फरक पडतो इतकेच. आपआपल्या आवडी प्रमाणे डाळी वापरू शकता..
    2. मद्रासी कांदे (सांबार साठी वापरले जातात. साऊथ मध्ये) आपल्या कडे हि मिळतात मंडईत किंवा स्पेन्सर फ़ूड मॉल मध्ये.  हे कांदे तिखट चविचे असतात एकदम छोटेसे. याचि चव छान लागते त्यामुळे मी अनेकदा वापरते आमटीत.  उपलब्ध नसल्यास तुम्ही साधे नेहमीचे वापरले तरी चालेल.
    मन