तिरंगा सॅंडविच

  • ब्रेड स्लाइसेस
  • मैदा
  • पांढरे घरचे ताजे लोणी/अमुल बटर
  • दुध
  • टोमेटो केचप
  • लाल तिखट
  • कीसलेले चिज/चिज स्प्रेड
  • मिरपुड
  • १ कप कोथिंबिर, अर्धा कप पुदीना, जिरे, आलं, लसुण, मिरची, साखर,
  • लिंबु रस आणि भाजलेलं डाळ किंवा दाणे
  • मिठ चविनुसार
२० मिनिटे


ऑरेंज चटणी :   थोडा मैदा परता कच्चा वास जाई तो वर.. .त्यात १ चमचा लोणी घालून जरास परता नंतर थोडं दूध टाका मग

टोमेटो केचप टाका शेवटी तिखट व मीठ टाकून परता. व बाउल मध्ये काढा. हि झालि ऑरेंज चटणी.

पांढरी चटणी :     ५० ग्रॅम चीज, मिरपूड व लोणी एकत्र करा. बाउल मध्ये काढा. हि झाली पांढरी चटणी.

हिरवी चटणी :   कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, जिरे, आलं, लसूण, मिरची, साखर, मीठ,
लिंबू रस आणि भाजलेलं डाळ किंवा दाणे एकत्र मिक्सर वर वाटून चटणी करा. बाउल मध्ये काढा.

या सर्व चटण्यांमध्ये अमूल बटर किंवा लोणी मिक्स करा.

४ ब्रेड स्लाइस चे कडा कापून घ्या. आता १ स्लाइस वर हिरवी चटणी पसरवून(स्प्रेड करा)घ्या त्यावर दुसरी स्लाइस ठेवून त्यावर पांढरी चटणी लावा. त्यावर तिसरी स्लाइस ठेवून ऑरेंज चटणी स्प्रेड करा. शेवटी वर एक चौथी स्लाइस लावून मधोमध तिरका काप देऊन दोन त्रिकोणी भाग करा. व सर्व करा.

सर्वांना स्वतंत्र दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद!  जय भारत!

हे सँडविच मध्ये चटण्यांमध्ये लोणी टाकल्याने चटणी ब्रेड वर स्प्रेड होण्यास मदत होते. चवीला ही  मस्त लागते.
लहान मुले आवडीने खातात.

मिडिया