अंबाडीची भाजी

  • अंबाडी - १ किंवा २ जुडी (निवडुन, चिरुन, उकडुन साधारण २ वाट्या गोळा तयार होईल एव्हढा ऐवज हवा)
  • चणा डाळ - पाव वाटी - ४-५ तास भिजवलेली
  • भात - मोकळा करून साधारण अर्धी वाटी
  • गुळ - सुपारी एव्हढा
  • मीठ - चविपुरते
  • तेल - अर्धी वाटी (थोडे भाजी परतायला, बरेचसे फोडणीला)
  • लसणीच्या पाकळ्या - ८ ते १० (सोलून स्वच्छ केलेल्या)
  • सुक्या लाल मिरच्या - तुकडे करून
  • कढीपत्ता - ८-१० पाने
  • हिंग - छोटा अर्धा चमचा
  • मोहोरी - अर्धा चमचा
३० मिनिटे
चार जणांसाठी

कढईत थोडे तेल गरम करून त्यात हळद, हिंग घालणे, चणा डाळ घालून परतणे

त्यात निवडून, चिरून, उकडून तयार झालेली अंबाडी घालून परतणे

त्यात मोकळा केलेला भात घालुन, चविपुरते मीठ घालून ढवळणे

सर्व मिश्रण गरम झाल्यावर त्यात गुळ घालणे

आता फोडणी पात्रात ४ मोठे चमचे तेल गरम करुन त्यात मोहोरी तडतडल्यावर लसुण घालणे

लसुण जरा तांबुस झाल्यावर लाल मिरच्या, कढीपत्ता घालणे, तिखट आवडत असल्यास तेही घालावे

आता लसुण चांगली खरपुस झाली असेल तर फोडणी चर्र करत भाजीवर घालावी

नीट ढवळून मिसळून घावी - वाटल्यास कोथिंबीर घालून सजवावी

भाकरी बरोबर खायला अगदी समर्पक भाजी आहे! त्यात पण भाकरी नाचणीची असेल तर धम्मालच!!

या भाजीला जरा अधिकच तेल लागते - पण त्याचीच चव आणि त्याचीच मजा आहे!

माझी आई