मी

नकळत वर्तमानकाळाचा भुतकाळ झाला आहे,

अन आयुष्य असणाय्रा गोष्टीच आठवणी झाल्या आहेत,

आजकाल मनात माझ्या या आठवण्नीची चारोळी उमटते,

पहिल्या ओळीमधील माझ्यातील मी मात्र शेवटच्या ओळीमध्ये गायब असते.

सध्या पुन्हा एकदा मी माझ्यातील मीचा शोध घेत आहे,

त्यासाठी वर्तमानातील प्रत्येक क्षणं जगतं आहे,

आदल्या दिवशीच्या प्रत्येक रात्री ती मला सापडते,

पणं दुसय्रा दिवशीची सकाळ होईपर्यंत पुन्हा गायब झालेली असते.

ही तारेवरची कसरतं सध्या रोजचं सुरू असते,

तीलाचं ठाऊक, ती का माझ्याशी हा लपंडाव खेळते,

खेळात राज्यं मात्र नेहमीचं माझ्यावर असते,

तरीही मला हा खेळ जिंकण्याची आशा असते.