अंबाडीची आमटी

  • अंबाडीची फळे - १२-१५
  • उडिद डाळ - दोन मोठे चमचे (सुकी भाजून गुलाबी करून घेणे)
  • धणे, जिरे, तांदुळ, मोहोरी - प्रत्येकी एक ते दीड छोटा चमचा (एकत्र भाजून घेणे)
  • ओले खोबरे - दोन मोठे चमचे (भाजुन गुलाबी करून घेणे)
  • फोडणीचे साहित्य - नेहमिप्रमाणे
३० मिनिटे
चार जणांसाठी

भाजून घेतलेले सर्व जिन्नस एकत्र (सुके) वाटून घेणे.

त्यात एक मोठा चमचा ओले खोबरे घालून वाटुन घेणे. मग पाणी घालून जरासे वाटणे.

तेलाच्या फोडणीत मोहोरी तडतडल्यावर हिंग, हळद, कढिपत्ता, लाल  तिखट घालणे.

त्यात सोललली अंबाडीची फळे घालणे आणि परतणे.

आता सर्व वाटण घालून ढवळून एक चटका देउन झाला कि गरम पाणी (आमटी घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे कमी / जास्त) घालणे.

चवीप्रमाणे मीठ, गुळ घालून उकळी आणणे.

विस्तव बंद करून मग चिरलेली कोथिंबिर  आमटीत घालणे

पावसाळ्यात ही फळे (अगदी छोट्या कैऱ्यांसारखी दिसतात) बाजारात  मिळतात. वाटणामुळे आमटी चमचमीत होते. एखादा जिन्नस कमी जास्त झाल्याने विशेष फरक पडत नाही. म्हणून करायला एकदम  सोप्पी आमटी आहे!

आमटित, मसाल्यात शिजलेली चमचमीत आंबट फळे चोखायला मजा येते!

माझ्या सासुबाई!