दिशा

समीरला त्या दिवशी जरा उशिराच जाग आली.. पण आज त्याने काहीच फ़रक पडणार नव्हता.... आज रविवार आणि त्यातही त्याचा वाढदिवस होता... आजचा दिवस त्याने स्वतःसाठी राखून ठेवलेला होता.

    लोळतच त्याने मोबाइल बघितला...जवळपास सगळ्याच मित्र-मैत्रीणींचे मेसेज आणि फोन येऊन गेलेले होते... पण ज्या फोनची तो वाट पाहत होता तो नाही....

    नकळतच तो भुतकाळात शिरला...जवळ जवळ एकरा महीने...... त्यादिवशी तो जितका निराश होता तितका आयुष्यात कधीच झालेला नसेन.... त्याच्या कंपनीत खुप समस्या होत्या आणि त्या सोडवण्यासाठीचे त्याचे सगळे प्रयत्न विफ़ल झाले होते..त्याचे आई-वडीलही त्याला ती कंपनि येईल त्या किमतीत विकून टाकून त्यांची कंपनि सांभाळायला सांगत होते.. ज्या मित्र-मैत्रीणींना त्याने स्वतः नुकसान सोसून मदत केली होती आज त्यांना त्याच्याशी बोलायलाही वेळ नव्हता.... जेव्हा त्याला या सगळ्याच्या सोबतीची गरज होती तेव्हा कोणीच त्याच्या सोबत नव्हते....

    आयुष्यातल एक स्वप्नही आपण सत्यात उतरवु शकलो नाही ही खंत त्याला जगु देत नव्हती....म्हणुनच त्याने हे जीवनच संपवायच ठरवल..... आणि घरातुन बाहेर पडला........