पावटे घालून आठलांची भाजी

  • पावटे - १ वाटी (रात्रभर भिजवुन, मग कुकरमध्ये शिजवुन)
  • आठला - २ वाटी (चिरुन, साफ करुन, मग कुकरमध्ये शिजवुन)
  • ओले खोबरे - १/२ वाटी (चमचाभर जीऱ्याबरोबर जरा खडबडीत वाटून घेणे)
  • फोडणीसाठी - मोहोरि, हिंग, हळद, कढीपत्ता, लाल मिरची पावडर
  • चविपुरते मीठ, कोकम, गुळ
  • सजवायला - खोबरे - कोथिंबिर
३० मिनिटे
चार जणांसाठी

तेल गरम झाल्यावर मोहोरी घालून तडतडल्यावर हिंग, हळद, कढिपत्ता घालणे

कोकम (एक किंवा दोन - किती स्ट्रॉंग असेल त्याप्रमाणे) आणि जिरेखोबरे व लाल तिखट घालणे आणि ढवळणे

आता शिजलेले पावटे आणि आठला घालणे, चवीप्रंआणे मीठ, गुळ घालणे, ढवळून मग झाकण ठेवणे

(पावटे आणि आठला शिजवताना जे पाणी घातले आहे ते पुरेसे वाटत नसल्यास थोडे गरम पाणी घालावे)

भाजीला छान उकळी आल्यावर खोबरे कोथिंबिर पेरून विस्तव बंद करणे, झाकण ठेवून वाफ जिरू देणे

आवडत असल्यास थोडा काळा (गोडा) मसाला घालू शकता

उन्हाळ्यात फणस हाणून झाल्यावर आणि नुसत्याच टाईमपास ला आठला खाउन उरल्या तरच हा पदार्थ करता येइल!

भाकरीबरोबर ठेचा आणि ही भाजी - वाः क्या बात है! करून बघाच!!

माझी आई