मॅगी चिकन क्युब फ़्राईड राईस

  • मॅगी चिकन क्युब ३
  • २ ते ३ वाटया बासमति तांदुळ
  • श्रावण घेवडा उभा कापलेला मुठभर
  • फ़्लावर ची छोटि फुले मुठभर
  • गाजर उभे कापलेले तुकडे मुठभर
  • चिरलेली कांद्याची पात १ वाटी
  • आलं १ इंच बारिक कापलेले
  • ८ ते १० लसुण पाकळ्या बारिक चिरुन
  • ५ हिरव्या मिरच्यांचे उभे तुकडे कापलेले
  • चक्रिफ़ुल २
  • सोयासॉस ४ चमचे
  • मीठ चवीनुसार
  • मिरपुड १/२ चमचा
  • तेल आवश्यकते नुसार
  • साखर १/२ चमचा
३० मिनिटे
  1. बासमती तांदुळाचा दुप्पट पणी घालून मोकळा भात शिजवून घ्या. हा भात परतीतं गरम भात पसरून वर गोडेतेल सोडून भात मोकळा करून घेऊ शकता.
  2. कडईत नाहीतर मोठ्या नॉनस्टिक फ्राइंग पॅन मध्ये तेल गरम करा यात चक्रिफ़ुलाची फोडणी करा.
  3. आता यात आलं लसूण बारीक चिरलेले घालून जरासा परतून घ्या.
  4. मग हिरव्या मिरच्या घालून जरासा परतून झाल्यावर फ्लॉवर, गाजर, श्रावण घेवडा घालून परतून वाटल्यास एक वाफ आणा. जेणे करून त्यांचा कच्चटपणा मोडला जाईल. भाज्या जास्त शिजवू नका. अर्ध्या कच्च्याच असू देत. नाही तर भात खाताना मजा येणार नाही.
  5. आता कांद्याची पात घालून जरासा परता. लगेचच मोकळा शिजवलेला भात घाला.
  6. त्यावर मॅगी चिकन क्युब चुरून घाला. छान पैकी परता. मिरपुड घाला.
  7. आता सोयासॉस साखर व चव पाहून अगदी मोजकेच मीठ घाला.
  8. मस्त परतून वरुन कांद्याच्या पातिने सजवून गरमा गरमच खायला वाढा.. हा भात गरम खाण्यात मज्जा आहे.

  • शाकाहारी लोक चिकन क्युब ऐवजी व्हेज क्य़ुब वापरू शकतात.
  • फ़्लावर शिवाय तुम्हि उभा चिरलेला कोबी, सिमला मिर्चि हि वापरु शकता.
  • आवडत असल्यास याच भातात श्रेडेड चिकन सुध्दा घालता येईल.