बोंबिल फ्राय

  • ७ -८ ताजे ओले बोंबिल
  • मुथभर कोथिंबिर
  • ८ -९ लसूण पाकल्या
  • १ चमचा जीरे
  • २ हिरव्या मिरच्या
  • पाव चमचा हळद
  • १ ते दिड चमचा लाल तिखट
  • १ लिंबाचा रस
  • तांदुळाची पिथी
  • मीट
३० मिनिटे
४ जण

सर्वप्रथम बोंबिल दोन भाग करुन पोटाकडून अर्धवट कापुन घ्यावेत. साफ धुवून घ्यावेत.

कोथिंबिर, मिरची , लसुण, जीरे, याची गोळी मिक्सर मधून वाटून घ्यावी.

वाटलेली गोळी, हळद, तिखट, मिट, लिंबाचा रस,एकत्र करून बोंब्लाना लावून घ्या.

१५ मिनिटे मुरवत थेवा.

तापलेल्या तव्यावर तेल टाकून , तेल नीट तापल्यावर बोंबिल तांदुळच्या पिटी मध्ये घोळवून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत.

बोंबिल पाट्याखाली थेवायची गरज नही , तांदुळाच्या पिथिने कुर्कुरित होतात.

आई