छू मंतर.ऽऽऽऽ

पहाटे साडे तीनची वेळ सगळी कडे अंधार काळोख . देऊळ काळ झाडे काळी प्रकाशाच्या पलीकडील सगळ काळ , एवढच काय? प्रकाशाच्या टप्प्या बाहेर येणारे नदीचे पात्र देखिल काळेशार. अगोदरच थंडीचे दिवस त्यातून मध्यरात्र त्यामुळे वातावरणात गारठा फारच जाणवत होता. रस्त्यावरचे दिवे देखिल धुक्याच्या शालीत तोंड झाकून जणू उभ्या उभ्या पेंगुळलेले होते म्हणूनच की काय त्यांचा उजेड ही मंद
 वाटत होता . सगळीकडे निरव शांतता. रात्री भो ऽऽभो ऽऽ करत ओरडणारे कुत्रे देखिल एखाद्या दुकानाचा आडोसा पाहून गारठ्या पासून बचाव
 करत पेंगुळलेल्या अवस्थेत शरीराच मुटकुळं करून पडलेले होते. ह्या  अश्या वातावरणात चौकातल्या पुतळ्या जवळ
एक व्यक्ती मोटरसायकल घेऊन कोणाची तरी वाट पाहत हात चोळून कानशिलाला लावत शरीराला उष्मा देत  उभी होती. गल्लीच्या कोपऱ्यावरून एक काळी सावली हालतांना दिसली आणि त्याने हात चोळणं बंद करून निरव शांततेला छेद देत धुडऽऽ धुडऽऽ करत गाडी सुरू केली .
काही ही न
बोलता ती व्यक्ती मोटार सायकलवर बसली . धुडऽऽ धुडऽऽ करत मोटार सायकल वातावरणातील शांतता ढवळत लांब निघून गेली. मोटर सायकलचा आवाज आता दूर अंतरावरून कमी कमी होत पार विरून गेला होता . चौकात  पुन्हा एकदा शांतता भरून उरली होती .
 धुडऽऽ undefined करत गावातून मोटर सायकल गावातील प्रत्येक चौक आणि चौक जागवत गावातून बाहेर  निघाली ती थेट जव्हारच्या दिशेने.
                वाहन गावाच्या बाहेर निघाले तेच मुळी  सुसाट वेगाने  . वातावरणात तसा बदल जाणवत नव्हताच.एकतर गाडीचा वेग आणि त्यात मोकळी माळ रान त्यामुळे गारवा आता अंगाला झोंबत होता म्हणूनच की काय एवढ्या वेगात ही माघे बसलेल्या इसमाचा विडी पेटवण्याचा प्रयत्न चालला होता.
" झाल का राजाभाऊ?, का थांबू ? " त्या आवाजाची हाक आणि राजाचे बिडी शिलगावणे एकाच वेळेस झाले आणि राजा रंगात येत  म्हणाला.
" पंधरा वर्षाची प्रॅक्टीसे (सराव ) येड्या , धर गरम व्हय! " . पुढच्या इसमाने लगेच हात माघे करून बिडी हातात घेऊन  एका हाताने गाडी चालवत तिचा आनंद घ्यायला सुरवात केली.
" बाकी काही म्हण राजाभाऊ!, हा बाबा एकदम खंगरी (पोहचलेला) आहे. "
"आंऽऽ! " काही ऐकू न आल्यामुळे राजाभाऊने कान पुढकेला. गाडीचा वेग थोडा कमी करत गाडीवरचा इसम जरा मोठ्याने ओरडत म्हणाला
" अरे!, हा बाबा लै पोहचेल हे(आहे). "
याच्या ह्या वाक्याला वातावरणाला साजेशी प्रतिक्रीया देत राजाभाऊ म्हणाला, " पाहूऽऽ! ,चाल पुढ! ". एवढ म्हणाल्यावर पुढच्या इसमाने पुन्हा वाहनाला वेग दिला.
                    वाहनाने आता बरेचशे अंतर कापले होते.जवळपास दोन ते अडीच तास वाहन सतत undefined undefined करत धावत होत. रात्रीच्या काळोखात पहाटेची लाली पसरायला सुरवात होत होती. त्या पहाटेच्या लालीने जणू सगळ वातावरण हलक करून टाकल होत. रात्रीचा बोचरा गारवा आता थोडा आल्हाददायक भासत होता. चिव चिव करत झाडांच्या फांद्यान फांद्या जाग्या होतांना दिसत होत्या. सतत दोन अडीच तास
एकाच जागेवर असल्यामुळे दोघांचही अंग आंबल होत. अजून  ते त्यांच्या प्रवासाच्या अर्ध्या टप्प्यात पोहचणार होते आणि तिथून पुढचा तेवढयाच वेळेचा प्रवास पाई करावा लागणार होता, त्यामुळे अंग आखडल असतांनाही दोघही थांबायला तयार नव्हते. अजून किमान विस ते तिस मिनिट प्रवास मग थोडा उसंत आणि पुन्हा प्रवास.
" काऽऽरे राजा भाऊ!, झोपला का काय? " ह्या वाक्यागणिक उसळत राजा म्हणाला
"एऽऽ!  रम्या ऽऽ,तुझ्या ..... , तुमच्या आख्या खानदानात मला झोपवल असा आहे का कोणि? . मला विचारतोय झोपला का?, थांबव .. थांबव गाडी!.
इथच उतरतो मी, थांबव तुझ्या .."
" राजा भाऊ ! काय झाल?. अहो मला तस नाही बोलायच होत, च्या मारी च्या प्यायच्या आतच गरम होताय!... " 
" ए ऽऽ थांबव म्हटला ना तुला . "
" ओ राजा भाऊ चुकी झाली बुवा शांत बसा आता!, नै तर कीऱ्या लाकड पाडल माझ्यावर." काकुळतीला येत तो रमेश म्हणाला.
" तो किरण्या माझ्या कडे दहादा आला तव्हा मी हा म्हणल ध्यानात घे. लै माजू नको...! . माझ्याबरोबर यायच तर मी विचारल तेवढच बोलायच , कळल का? "
" हा! " गप गुमान मान हलवत तो रम्याने हाकारा भरला.
" नुसती बैलावानी मान नको हालवू, काय सांगतो ते निट ऐक , नाहीतर त्या कीरण्याला इचार.. काय? "
"आता चुकल म्हणल ना! . लै ताणू नका."
तरी राजाचा वर बोल होताच
"ठीके ! , लौकर चा पाझ आता!, काय? "
          राजा भाऊ तसा अजब वल्ली. शिक्षण म्हणाल तर दहावी नापास पण दुनियेच्या शाळेत असा काही तयार झाला होता की पदवीधर पाणी भरायचे त्याच्या समोर . पोटापाण्यासाठी पुर्वी मटक्याच्या चिठ्ठ्या लीहायचा . तिथून राहून अस काय गणित शिकला की आज ओपनला काय येणार आणि क्लोजला काय ह्याच गणित नंबर फुटायच्या पहिले तयार असायच, त्यामुळे चिठ्ठ्या वरती न फिरवता मधल्या मध्ये खाऊन मटक्याचा मालक आणि तो दोघही गबर झाले होते. आताशा त्याने तो व्यवसाय सोडला आणि व्हिडिओ लायब्ररीचा व्यवसायात रुळला होता.
आता रोजी रोटीची कटकट न राहिल्या मुळे आणि वाचनाची आवड असल्यामुळे तो अध्यात्माकडे वळला होता. अध्यात्म आल म्हणजे मग तिथे बाबा आलाच , मग त्यांच्या त्या साधना, उपासना सार सार काही हा फावल्या वेळात कोळून प्यायला होता. तो जेंव्हा सिद्धिंवर बोलायला लागायचा तेंव्हा चांगला माणुस गुंग होऊन जायचा. आणि ह्या सगळ्या खटाटोपामुळे समाजात त्याच एक वजन प्रस्थापित झाल होत.
मोठ मोठे दादा, भाई त्याला राजा भाऊ म्हणून हाका मारत मग असा हा राजा भाऊ कीतीही सनकी असला तरीही.
"राजा भाऊ चला!, दुगांव माशी चौफुली आली ."  वाहन रस्तेच्या कडेला थांबवत रम्या म्हणाला
"हं!.. , आणि चहाच काय? " राजा भाऊनी गुरकत विचारल
" अहो हा !, ति काय झोपडी हाय तिथ भेटल आपल्याला.
" आक्का दोन चहा दे! . आणि गाडी हितच लावतो बर का!. भगत हाय ना गावात  त्यांनला भेटायला चाललो. "
" अऽऽऽ ! भगताकड आलास की , मग झापाला खेटून उभी करकी रे ! तुझ गाड."
 आक्काच्या सांगण्यावरून रम्याने गाडी झापाला खेटून ऊभी केली. चहा घेतला आणि पुढचा प्रवास करण्यासाठी गावाच्या दिशेने  राजा भाऊ आणि  तो पाई निघाले.    
                                               राजा भाऊ आणि रम्याला येऊन पुर्ता आठवडा ऊलटला . आज अमावस्या आजच काम करायच म्हणून भगत
आदल्या दिवशीच आपल्या चेल्या सकट कीरणच्या गावाबाहेरच्या (फार्म हाऊस) शेतावर डेरे दाखल झाला होता. रात्री किरणने भेटण्याच प्रयत्न केला पण भगत उद्याच्या तयारीत असल्यामुळे भेटू शकत .साधन सामग्रीची यादी किरणच्या हातात दिली आणि नैवेद्य तयार ठेवा असा आदेश आतल्या खोलीतून देण्यात आला . उद्या रात्री बरोबर १० वाजता बारदान घेऊन या म्हणत किरणची बोळवण करण्यात आली. किरण थोडा नाराज झाला पण बरोबर रमेश होता त्याने त्याची समजुत काढली . भगताच गुणगान केल आणि तो दिवस मावळला.
                                               ज्या वेळेची वाट किरण ईतक्या दिवसापासून पाहत होता तो दिवस म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवसानंतर त्याला सगळे हिशोब चुकते करता येणार होते . राजाभाऊ! दोन क्षण किरणला ह्या नावाच स्मरण झाल पण एखाद झुरळ जस अंगावरून झटकाव तस त्याने राजाभाऊचे विचार झटकून टाकले. 'चला निघायला हव!' अस मनाशीस म्हणत किरण शेताकडे निघाला.
                                                बरोबर दहा वाजले आणि सर्व मंडळी  शेताच्या घराच्या आंगणात जमली . किरण , बापू , सुन्या , मन्या , आणि रमेश सगळे सगळे हजर होते नव्हता फक्त राजाभाऊ त्याच ते नसन किरणला खटकत होत पण काय करणार कामगिरीहून आला तसा दोघात बेबनाव झाला होता पण काय करणार ?. एवढ्यात चलो आंदर बुलाया म्हणत बाबाचा चेला वर्दी देऊन गेला म्हणून सगळे आत शिरले आतल दृश्य पाहून तर सुन्याला मळमळल्या सारख झाल आणि ओ‌ऽऽ करत तो बाहेर पळाला. आतमध्ये एक बली वेदी तयार केली होती जवळच एक हवन कुंड तयार केल होत.  बलीवेदिवर आणि हवन कुंडावर चे लाल लाल रक्त शिंपडल होत .धग धगता हवन कुंड पेटलेला होता ,कोंबडिचे काळे  पिस इस्ततः पडले होते आणि हवनाची जी सामग्री असते ती एका ताटात निपचित कातड सोलून पडली होती. सुन्याच्या त्या वागण्याने बाबाचा पारा चढला " कौन रे तो हायसा?, आणि असा माणुस इथ रे काय करतो? . इकड आण की त्याला " . म्हणत भगताने त्याला आपल्या  
जवळ बोलावल " अरे असा कसा रे तू माणुस घाबरतोस ? घाबरू नकोस. अजून तर सुरवात व्हायची कामाला घे , घे दवा घे ! . जा बस तिथ !
ए एक काम कर " आपल्या चेल्या कडे वळून बघत म्हणाला " सगळ्यांना दवा दे की थोडी थोडी नाही तर, ऐन वेळेस ऊठून पळायचे, किरणदादाला पण दे!. ", " नाही तर  दादाच्याच हातान दे ना!".  नाही म्हणाव तर भगताचा राग ओढवल म्हणून सर्व  मंडळी प्रसाद
 घेण्यात गुंग झाली . तो पर्यंत भगताने सगळ्यांना एका रांगेत एकमेकाच्या शेजारी बसवल. मंडळी प्रसाद घेण्यात गर्क होती  तो पर्यंत
भगताच्या चेल्याने लाला कुंकाने एक त्यांच्या भोवती एक रिंगण घालायला सुरवात केली. भगत तोंडाने काही तरी पुटपुटत होता आणि सगळ्यांकडे पाहत होता. एक तर वातावरण धिरगंभीर झाल होत आणि त्यातल्या त्यात ते भगताच चेल्याच्या मार्फत कुंकवाच रींगण घालण
म्हणज काळजाचा थरकाप उडायला लावणार होत. बली वेदिला बांधलेली दोन कोंबड उगाचच क्वाकऽऽ क्वाक करून ह्या वातावरणात भर टाकत होते. त्यांची ती  सगळ्यांची भेदरलेली नजर पाहून भगताच्या भेसुर चेहऱ्यावर पुसटशी समाधानाची रेषा उमटली.
 जास्त ताण वाढू नये म्हणून भगताने बोलायला सुरवात केली.
 " ए बाबा नो घाबरायच नाही की एवढ !  मी आहे की!. हं ! तुझा रिंगण झाल ना! ठिक!, आता पुजा
चालू असतांना कोणी मध्ये नाही रे ऊठायचा . ठिक".
          झाल एकदाच रिंगण घातल गेल दोन चेले मंडळी हात जोडून उभे राहीले . हवन कुंड प्रज्वलीत केल गेल , आणि भगताचे मंत्र पठण चालू झाल. " हम रम लम धनदायिष्टे स्वाहाऽऽ, हम रम लम धनदायिष्टे चस्वाहाऽऽ! " हवन कुंडात प्रत्येक मंत्रा बरोबर एक एक आहूती पडायला सुरवात झाली. "हम रम लम धनदायिष्टे कुरू कुरू स्वाहाऽऽऽ!. हुं चल की लवकर , कसला खोळंबा करतेस चालऽऽऽऽ! हम रम लम
धनदायिष्टे स्वाहा". आता काय ?, मदिरा हवनात पडली  आणि हवनातल्या ज्वाळांनी उग्र रुप धारण केल . त्या अग्नींच्या ज्वाळेत तिथल वातावरण आणखीन गुढ झाल. अगोदरच भेसुर भासणारा तो भगत त्या ज्वाळा प्रज्वलीत होता आणखिनच उग्र दिसू लागला.
"हम फट स्वाहाऽऽऽ, चल की काय झाल ?, चाल!.. काय म्हणतेस नैवेज्ञ पाहीजे हा घे , चाल लौकर चल माणस खोळंबली की चाल"
आणि अस आव्हान भगत करत असतांना हवन कुंडा जवळची मासाने भरलेली ताटली आपोआप उडाली आणि हवन कुंडात जाऊन पडल्या बरोबर  भगत ओरडला " आली आली " आणि तशी समोरच्या माणसांची चुळबुळ सुरू झाली . अगोदरच सुन्याची त्या वातावरणाने  घाबरून गाळण उडाली  आणि त्यात ताटलीच्या तश्या उडण्याने तो पुरता भेदरला आणि उठून उभा राहणार तेवढ्यात
" एऽऽऽय उठू नकोस की , नाही तर फुकाटऽऽ मरशील. बस्स !, खाली बस्स ऽऽऽ! " म्हणत भगताने आदेश सोडला. आता सगळेच मनातून
टरकले होते आणि इकडे भगताच मंत्र म्हणन चालू " हम बोल काय पाहिजे.. काय ? बळी..? " अस म्हणत त्याने सुन्याकडे आपली भेसुर नजर फिरवली आणि भेळसांडलाच आता आपल काही खर नाही म्हणून सुन्याची बोबडी वळायची बाकी राहीली.
" एऽऽ घाबरू नकोस ! मागच कोंबड दे की इकडे" म्हणत भगताने ते कोंबड हातात घेत हातानेच मान पिळून त्याचा बळी दिला . त्या लवलवणाऱ्या ज्वाळांनी  ते कच्च मास गिळायला सुरवात केली आणि त्या अर्धवट कच्च्या अश्या मासाचा उग्र दर्प सगळ्या खोलीभर पसरला.
" हम ! चाल ऽऽऽ, खोळंबा कीती करतेस की हम ऽऽ! चालऽऽ!, काय? , काय पाहीजे? एय नैवेज्ञ दे की रे भक्ताकडे म्हणत" भगताने किरणकडे पाहीले किरण ने पटकन नोटांनी भरलेली पिशवी भगताच्या चेल्याच्या स्वाधीन केली . एका मोठ्या पाटीत त्या नोटांची पुंडके टाकण्यात आली त्यात जास्त करून मोठ्याच नोटांची बंडले(पुंडके) होती ती तशी पुंडके घेऊन चेला बाहेर जातांना पाहून किरणच्या चेहऱ्यावर
काळजीची छटा उमटू लागली हे त्या भगताच्या तिक्ष्ण नजरेने पुरते हेरले आणि तो म्हणाला,
" एय! विश्वास नाही की तुझा?, उठ जा की त्याच्या बरोबर तुला पण जायच आहे की उठ! "
भगताच्या त्या तश्या बोलण्याने किरण थोडा लाजला आणि " नाही बाबा! विश्वास हाय म्हणून तर हाय की "
" वेळ घालवू नकोस की ! , उठ म्हणालो की उठ जा !, आभालाच्या खाली दाखव जा! " म्हणत भगताने त्याला आज्ञाच केली.
आता भगतच म्हणतो म्हणाल्यावर किरण नाही कसा म्हणनार एक तर त्याला हि हेच हव होत, कारण जवळपास ती रक्कम कैक लाखाच्या घरात
होती. भगताने उठ म्हणाल्यावर किरण उठला आणि त्याच्या चेल्या बरोबर बाहेर गेला. इकडे भगताने मोठ मोठयाने मंत्र म्हणायला सुरवात केली
"हम रम लम धनदायिष्टे कुरू कुरू स्वाहाऽऽऽ!,...हम रम लम धनदायिष्टे कुरू कुरू स्वाहाऽऽऽ!.चाल ऽऽऽऽ! , भगताच्या सादेला होकारा दे!  हम रम लम धनदायिष्टे कुरू कुरू बरस की , बरस ".  आणि एवढ सार काही होत असतांना 'फाटऽऽऽऽ' असामोठ्ठा आवाज झाला ,तेवढ्या वेळात बाहेर गेलेला किरण पण त्या आवाजाने पैश्याच्या भरलेल्या पाटी सकट खोलीत प्रवेश करता झाला. त्या आवाजाने ते घर थरथरल घरावरचे पत्रे थरथरले आणि ते थरथरत असतांना एक पत्रा निसटला आणि.. आणि पैशांचा पाऊस पडू लागला.
तो पैशाचा पाऊस बघून सगळे आवाक झाले . सगळ्यांची तोंड उघडी " अरे ! बघत का बसतोस भर की  पाऊस पोत्यात भर!, हा मात्र तु थांबला की पाऊस थांबल बघ! " म्हणत सगळ्यांना भगताने बंडल पटा पटा भरायला लावली . एक, दोन , तीन , चार.... म्हणता म्हणता दहा पोती भरली . त्यात दहा, विस, पंनास , शंभर... सर्व प्रकारची पुंडके होती . हि सर्व पुंडके भरून आता हात
थांबू लागले तसे भगताने शेवटच्या पोत्यात किरण ने बरोबर आणलेला नैवेद्य पण ओतला आणि सगळी पोतींची तोंड बांधून एका रांगेत भिंतिला
ऊभी करून ठेवायला लावली मग आपल सगळ पुजन सामग्री एका पोत्यात घातली आणि ते पोत सुन्याच्या हाताने बाहेर गाडित ठेवायला सांगितल . सगळ्यांना खोली बाहेर काढून त्या खोलीला कुलुप घातल आणि त्याची किल्ली किरणच्या हातात देत भगत म्हणाला,
" धर की रे ! तुझ नशिब. आता सगळ काम झाल . सकाळ पर्यंत थाम की जरा मध्येच रात्रिचा जाऊ नकोस नाही तर आता मी नाही जिवाचा काही बरा वाईट झाला तर कोण जवाबदार?, तेव्हा काढ की रे कळ ." म्हणत किरणला आपल्या जाण्याची सुचना दिली कारण ठरल तसच होत की काम झाल्याबरोबर भगत लगेच जाईल. भगत हे समजवून सांगत असतांना त्यांच्यापैकी एकाने  खोलीच्या जवळ जाऊन कान
  लावण्याचा प्रयत्न केला तर " हा ऐक की !,ऐक सांग काही आवाज येतो की काय? " म्हणत भगत सगळ्यांनकडे रोखून पाहू लागला " कोणी पण आत जाण्याचा विचार करायचा नाही तुमच नशीब तुमच्या पासून दहा तासाच्या अंतरावर आणि मरण लगेच बंद कुलपाच्या आत , लगेच तेंव्हा देवी तिचा नैवेद्य खाते आहे तेव्हा तिला तो खाऊ द्या की , का तुमचा नैवेद्य देता तिला. सांग ! सांग हाड मोडल्याची आवाज येतात की नाही सांग! म्हणत भगत त्या दाराजवळच्या माणसाकडे वळला तसा त्याने घाबरत मान हलवली  आणि दरवाज्याची जागा सोडली .
               आता भगताला जाण्याची वेळ आली किरणने  रमेशला तस गाडित भगताला स्टेशनवर सोडायला सांगितले होतेच पण आता इथही
वेळ होता म्हणून सगळे मिळून भगताला सोडण्यासाठी गेले.
                सकाळ झाली भगत त्याच्या गावी पोहचला असेल म्हणत किरण आपल्या घरावरून खाली पडलेल्या पत्र्याकडे पाहत होता. मनात विचार आला आता पत्राच काय चांगल घरच बांधतो आता म्हणत खोलीच कुलुप उघडायच म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन कुलुप उघडून खोलीत घुसला तर पाहतो तर काय ते अर्ध कच्च पक्क मास घुस कुरतडत बसली होती . घराच्या छपराने काजळी धरलेली , इकडे तिकडे इस्ततः कोंबडीच्या रक्ताचे सडे पडलेले , आता हे सगळ निट करायच म्हणजे पण तेवढ्यात रम्याने एका पोत्याच तोंड उघडल आणि आवाक
  होत घाई घाईने दुसऱ्या, तिसऱ्या... आणि तो ओरडलाच
" किरण भाऊऽऽऽऽ!" तसे सगळ्यांची हवाच गेली .आशेने लकलणारे डोळे आता निस्तेज झाले होते. पुरता तिस लाखाचा गंडा आणि वेड्या सारखे त्यांनी त्यांच्या हाताने भगताच्या हातात दिले. पुरते फसले गेले म्हणाल्यावर सगळीकडे शोधा शोढ चालू झाला , दुगांव माशीला पण जाऊन  भगताचा शोध घेण्यात आला पण  भगत ना त्याचे चेले सापडायला तयार . बर पोलीसात जाव तर आपल्याच हाताने त्याला स्टेशनावर बसवून आलो अस थोड सांगता येणार म्हणून गप्प राहून होता होईल तेवढा शोधण्याचा प्रयत्न चालू झाला. आठ दिवस पंधरा दिवस जमेल तस शोधा शोध चालू ठेवली आणि पुढे तीही थंडावली . बर एक दोन जणांनी पोलीसात फिर्याद द्यावी म्हणून विचार केला पण , आमच्याच हाताने पैसे  त्याच्या पिशवीत भरून त्याला स्टेशनवर सोडून आलो  म्हणून अस थोड सांगता येणार म्हणून गप्प राहून होता होईल तेवढा शोधण्याचा प्रयत्न चालू झाला. आठ दिवस पंधरा दिवस काही  पण काही धागा सापडेना मग नाही म्हणत आपल्या दैवाला दोष देत सगळे गप्प मुग गिळून बसले.
                 आता गावाला गेलेला राजाभाऊ पण गावात आला होता दबक्या दबक्या आवाजात ही चर्चा सगळ्या गावात पसरली होती आणि राजाभाऊ पण त्याचा चहाच्या घोटाबरोबर ह्या चर्चेचा  आस्वाद घेत होता "मी नाही बोललो होतो विचार त्याला "म्हणत  आपल्या चारचाकी
नव्या गाडीत बसुन मामाच्या गावाकडे दोन एकर जमीन विकत घेतल्याचे सांगत होता आणि किरण आणि त्याच टोळक मात्र स्वतः खड्ड्यात पडून लोकांपासून तोंड लपवत फिरत होते , कोणा कोणाच्या प्रश्नाला उत्तर देणार आणि कसे कसे देणार? ,
 
 काय?..... उत्तर! .