टॉमेटो शोरबा

  • टॉमेटो अर्धा किलो तुकडे करुन
  • १ बटाटा तुकडे करुन
  • आल्याच्या चकत्या
  • लसुण पेस्ट
  • साखर, मिठ चविनुसार
  • पुदिना पाने
  • तिखट (काश्मिरी मिर्ची चे असेल तर उत्तम) रंग चांगला येतो
  • हिरवी मिरची तुकडे, कोथिंबिर
  • तमालपत्र १,
  • फोडणी साठी : ओवा १/२ चमचा व लसूण बारीक कापलेला १ चमचा, साजुक तुप
३० मिनिटे

टॉमेटो चे तुकडे, बटाट्याचे तुकडे , आल्याच्या चकत्या, लसूण पेस्ट, साखर, मीठ, पुदिना पाने, तिखट, हिरवी मिरची तुकडे, तमालपत्र हे सर्व प्रेशर कुकर मध्ये १ ते २ शिट्टी देऊन शिजवून घ्या. गार करून कुस्करून गाळून घ्या. अगदी गरज भासली तरच थोडेसे गरम पाणी घाला. चव पाहून जास्त आंबट वाटले तर गरजे नुसार थोडीशी साखर व मीठ घाला.  गॅसवर उकळवून त्यात कोथिंबीर घाला. आता वरून साजुक तुप कढल्यात तापवून बारीक कापलेला लसूण व ओव्याची फोडणी घालून हा शोरबा गरमा गरम सर्व्ह करा.

  • लसूण व ओव्याच्या फोडणी ची चव छान लागते. लसूण जरा गुलाबी सर करून घ्यावा...
  • पावसाळ्यात असा गरम रसदार शोरबा पिण्याची मजाच काही और असते.

माझी माय...... आई