पाऊस...
हा फक्त एक शब्द नाही. हे एक गारूड आहे. मधमाश्यांचे असे पोळे की ज्याला
एक छोटासा द्गड चुकून जरी लागला तरी त्यातून अनंत आठवणीचे मोहोळ उठते.
या विश्वाच्या अफाट पसार्यात असंख्य माणसे व प्रत्येकाचे आपले असे वेगळे
विश्व! पण तरीही सर्वांना एका नाजूक धाग्याने बांधून ठेवतो तो हा पाऊस.
म्हणुनच कदाचित एखाद्याचे वय सांगताना 'त्याने इतके पावसाळेे पाहिले आहेत'
असे म्हणतात. 'उन्हाळेे किंवा हिवाळेे' असे नाही म्हणत.. कदाचित म्हणुनच
शताकानुशाताके त्याचावर इतके काही बोलले गेले, लिहिले गेले तरी हा आपला
प्राजक्ताच्या फुलाप्रमाणेे टवटवीत.. कधीकधी मला तर असे वाटते की पावसाला
आपण नकळतपणे मानवाचा दर्जाच देऊन टाकलाय जसा काही.. म्हणजे बघा हं, आपण
पावसाची वाट बघतो, तो आला नाही तर रागावतो, एकीकडे तमाम वेधशाळा
छातिठोक्पणेे 'पुढचे दोन तीन दिवस तरी पाऊस काही येणार नाही' असे सांगत
असताना, एखाद्या लबाड मुलाप्रमाणेे तो अचानक येतो, आिण आला की थाम्बायचे
नाव घेत नाही. तो जोरात कोसळला तरी आपल्याला नकोसे होते व जाताना तर तो
अगदी हुरहुर लावून जातो. काही का असेना, तो आपल्या भाव्विश्वाचा एक
अविभाज्य घटक असतो हे बाकि खरे... जन्मापासून ते अगदी शेवटपर्यंत तो आपली
साथ काही सोडत नाही..
आपल्या जन्मवेळेेी घरात्ल्यांच्या डोळ्यात तो आनंदश्रुंच्या रुपात
बरसतो. लहानपणी आपल्याला 'पाण्यात होड्या सोड्ण्यातली आिण कानात वार
भरलेल्या वासराप्रमाणेे चाहुबजुनी भटक््णयाल्तली गम्मत तो शिकवतो. आठवा ती
' ए आई मला पावसात जाऊ दे' किंवा 'सांग सांग भोलानाथ' सारखी गाणी, अवघे
बालपण क्षणभर का होइना, परत िमळाल्यासारखे वाटेल. 'खुप पाऊस पडू दे रे
देवा, म्हणजे मग शाळेेला सुट्टी मिळेल' या प्रार्थ्नेतला निरागसपणा
त्यानेच दिला असतो जसा काही..
तरुण्पणी तर काय, आधीच तरल, आतुर झालेल्या मनाला पाऊस चहुबाजुनी
खतपाणी घालत असतो. मग ते आवडत्या व्यक्तीला घेऊन पावसात मनसोक्त भिजणेे असो
वा गरमागरम भजी खात वाफाळलेल्या चहाचे घुटके घेत मारलेल्या निवांत गप्पा
असोत, किंवा मग एखाद्या दिवशी कामावर मस्तपैकी दांडी मारून घराच्या
खिडकित हरवाल्यासारखे तासनतास पाऊस बघत उभे रहाणे असो नाहीतर मित्रांबरोबर ट्रेक ला जाणेे असो, सगळीकडे पाऊस आपली मूक सोबत करतच असतो...
आिणे आयुष्याच्या संध्याकाळी हा पाऊस आपल्या डोळ्यात गताकाल्च्या आठवणींचे
पिसारे फुलवतो. थकलेल्या शरीर वा मनाला नवचैतन्य देतो.. जणू आशावाद देत
असतो, 'अरे वेड्या, घाबरू नकोस, जोपर्यंत मी आहे, तोपर्यंत
अंतानंतरही नवा आरम्भ आहेच आहे. कारण मी म्हणजेच जीवन, मी म्हणजेच
आशा..!! '
बघाना, आत्ता हा लेख लिहितानाही माझ्या मोबाईलवर 'श्रावणात घन नीळा
बरसला' हे गाणेे सुरु आहे. आिण डोळ्यासमोर साक्षात् श्रावण उभा आहे.
तेंव्हा आता थंबलेलेच बरे.
तुम्हा सर्वाना पाऊस अनुभावण्यासाठी शुभेच्छा...!!