इतकीही बावरून जाऊ नकोस वेडे,
तुझा श्वास माझ्या प्राणात आहे,
जे तू मला दिलं ते सारं,
आज माझ्या हृदयात आहे,
समजेल तुलाही ते सारे,
माझ्या डोळ्यात पाहशील तर.
सापडेल तुला तेव्हा वाटेवर,
तुझ्या भेटिला आलेलं माझं आकाश,
अन आठवतील तुला मी दिलेली,
अधीरतेने सारी चुंबनं.
येऊन भिडतील तुझ्या केसांचे,
रानजाईचे आर्जवी सुगंध,
मिठीत घेईल तुला हळूच,
माझ्या सारखी वेडी पावसाची सर.
होशील तू तृप्त तेव्हा जरी,
असेल माझा विरह सभोवती,
अन भासशील तू तशी स्वतःला,
दिसतेस माझ्या मिठीत जशी,
म्हणून म्हणतो,
बावरून जाऊ नकोस अशी,
तुझा माझा प्रवास हा,
जन्मांतरीचा सहवास आहे,
आपल्या सावल्या भेटल्या तर!!!!!