खास गणपतीसाठीं - १ - बेसनाचे मोदक

  • १. जाडसर चण्याच पीठ...... ५०० ग्रॅम
  • २. पिठीसाखर ................ ४०० ग्रॅम.
  • ३. साजुक तूप ................ ३०० ग्रॅम
  • ४. वेलची पूड.................. स्वादाप्रमाणें.
  • ५. मोदकाचा छोटा साचा.
२० मिनिटे
नैवेद्यासाठीं

कृति:      चण्याचे पीठ खमंग होईपर्यंत भाजावे. थंड झाल्यावर त्यात वेलची
पावडर व पिठी साखर मिसळावी. मोदकाच्या साच्याला आतून थोडी पिठी साखर लावून
घ्यावी. बेसनाचा गोळा साच्यात भरून दाबून आकार देऊन अलगद बाहेर काढावा.
मोदक तयार.

वरील तयार बेसनाच्या गोळ्याच्या मोठा  शंकू करून चाकून कोरून घेऊन मोठ्ठा मोदकहि बनवतां येतो.

पारंपारिक कृतीचा वापर करून स्वतः बनवलेली कृती.