खास गणपतीसाठी - २ - गाजराचे मोदक.

  • १. गाजरे........ ५०० ग्रॅम.
  • २. खवा ........ २०० ग्रॅम.
  • ३. साखर ...... २०० ग्रॅम.
  • ४. दूध ......... १ कप.
  • ५. साजुक तूप .१०० ग्रॅम
  • ६. वेलची पूड स्वादाप्रमाणें.
  • ७. पिठीसाखर .. थोडीशी, साच्याला लावण्यापुरती.
१५ मिनिटे
नैवेद्यासाठी

कृति:-  प्रथम गाजरे किसून घ्यावी. कीस तुपावर परतून घ्यावा. खवा, साखर,
वेलची पूड, दूध किसात घालून घट्ट होईपर्यंत ढवळावे. थंड झाल्यावर साच्याला पिठीसाखर
लावून दाबून हलक्य हाताने मोदक काढून घ्यावा.

गाजरे तुपात परततांना गाजराच्या उग्र वास जाईपर्यंत परतावीत.

पारंपारिक कृतीवरून स्वतः बनवलेली कृती.