कणकेचे शिंगोळे

  • कणीक २ वाट्या
  • डाळीचे पीठ १ वाटी
  • लाल तिखट चमचाभर
  • हिंग चिमुटभर
  • मीठ चवीनुसार
  • हळद १ छोटा चमचा
  • जिरे पुड छोटा चमचा
  • मोहरी फोडणीसाठी
  • पाणी लागेल तसे
  • तेल फोडणीसाठी
२० मिनिटे
२ जणांना एकदा

१. दोन्ही पीठ एकत्र करून त्यात तिखट, मीठ, हळद, जिरे पुड घालून घट्ट भिजवावे.

२. पीठ  थोड वेळ जाकून ठेवावे.

३. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी तडतडली की हिंग टाकावा व एक वाटीभर पाणी टाकावे.

४. पाण्याला उकळी येईतो भिजवलेल्या पिठाया बोटाया आकाराया शिंगोळ्या कराव्यात.

५. उकळलेल्या पाण्यात टाकाव्यात व वरून झाकण ठेवावे.

६.पाच मिनिटांनी पाणी आटल्यावर उलथण्याने हलवावे. कोरडे व थोडे खरपुस परतून खाली काढावे आणि गरम गरम खायला द्यावेत. 

भरपेट नाष्टा म्हणून उत्तम पदार्थ मुलांना इंडियन नुडल्स म्हंटले की आनंदाने मिटक्या मारत खातात.  

आई