बोलण्याच्या ओघात
मी धरिला तो हात
ती जराशी लाजून
'ईश' बोले जोरात
माझिया नावाचीच
अंगठी ती बोटात
पूर्ण झाले ते स्वप्न
भारुनी होतो गात
प्रेम माझे नादात
राहिले ना पोटात
घेउनी या बारात
फेर घेते हो सात
लाभला तो एकांत
ओढ लागे दोघात
जाहलो बेभान मी
केवड्याच्या मोहात
राहिला नाही धीर
दूर आहे 'गो' रात