धुंदी

मी मला नेहमीच सावरत गेलो

तिच्या मोहाने मीच बेधुंद झालो
राती जागवल्या तिच्या स्पर्शाने न्हालो
उजेडाच्या वाटेवरचा फकीर मी  झालो
नादात तिच्या सदा नाचत राहिलो 
नादान चाळ्यात नादार मी झालो
सखी समजून तिला सुखासीन बनलो
सोबतीला ना कोणी उदासीन झालो
पैसा होता तोवर मनसोक्त प्यालो
विकून सारे वैभव कफल्लक झालो
मदमस्त म्हणत मी मद्यपी बनलो
मरणाच्या दारात येऊन मी पोह्चलो.