दै. सकाळ मधील बातमी

ऑर्कुट'वर 'बॉम सबाडो'चा धुमाकूळ!
सकाळ वृत्तसेवा
  
पुणे - 'ऑर्कुट' या सोशल नेटवर्किंग संकेतस्थळावर बॉम सबाडो नावाच्या 'बग'ने शनिवारी धुमाकूळ घातला. प्राथमिक माहितीनुसार हा 'बग' पासवर्ड हॅकर असून, तो संबंधित "ऑर्कुट'धारकाचे अकाऊंट हॅक करतो. 
'ऑर्कुट'धारकांच्या स्क्रॅपबुकवर त्यांच्या मित्रगटातील व्यक्तीकडून 'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप येतो. इंटरनेट एक्‍सप्लोररमध्ये त्या स्क्रॅपवर क्‍लिक केल्यास एक्‍सप्लोरर हॅंग होते. ते पुन्हा सुरू करून ऑर्कुटवर लॉगिन होण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तीचा पासवर्ड हॅक केला जातो, असे इंटरनेटविश्‍वातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
या 'बग'मुळे ऑर्कुट आणि गुगलच्या अकाउंटचे कुकीज चोरून त्या आधारे इतरांच्या स्क्रॅपबुकवर स्क्रॅप टाकले जातात. त्याचबरोबर काही वेळेस काही नवीन कम्युनिटी तुमच्या अकाऊंटला जोडल्या जात असल्याचे आढळून आले आहे. 
'बॉम सबाडो' नावाने स्क्रॅप आला असल्यास...
१. संबंधित स्क्रॅपवर कोणत्याही स्थितीत क्‍लिक न करता ऑर्कुटवरून तातडीने लॉगआऊट व्हा.
२. तुमच्या अकाऊंटमध्ये कोणत्या नवीन कम्युनिटी आल्या असतील, तर त्या तातडीने डिलिट करा.
३. तुमच्या गुगल अकाऊंटचा पासवर्ड, सेकंडरी ईमेल, मोबाईल क्रमांक सर्व तातडीने बदला.