कविता सुचता सुचेना , हरवुन शब्द गेले
घेता क्षितीज रंगवाया , बदलुन रंग गेले ||
घेवुन स्वप्न काही, संसार थाटला जेव्हा
वृत्ते अबोल झाली , फसवुन छंद गेले ||
" ती " मला भेटण्या आली ,माळुन सोनचाफा
मी 'अभिजातता' शोधताना , हरवुन गंध गेले ||
आता निस्तब्ध सारे , एकांत साचलेला
तरीही स्मितहास्य तिचे ते , भिजवुन चिंब गेले||
कविता सुचता सुचेना , मी शून्यात साठलेला
"ती" बिलगली अशी की , विसरुन द्वैत गेले ||