कांदा भजी

  • ३ ते ४ कांदे उभे पातळ चिरून
  • हळद १/२ चमचा
  • कांदा लसूण मसाला किंवा तिखट २ चमचे
  • आखे जिरे १/२ चमचा
  • डाळीचे पीठ आवश्यकते नुसार
  • २ ते ३ चमचे तांदळाचे पिठ
  • गरम तेलाचे मोहन २ चमचे
  • तळण्यासाठी तेल आवश्यकते नुसार
  • मीठ चवीनूसार
२० मिनिटे

१) सर्वप्रथम कांदा उभा पातळ चिरून घ्या. यात मीठ घालून कुस्करून झाकून बाजूला ठेवा. जेणे करून त्याला पाणी सुटेल.

२) ५ मिनिटांनी कांद्याला पणी सुटेल थोडे. आता यात कांदा लसूण मसाला हळद जिरे घालून मिक्स करून घ्या.

३) आता यात तांदळाचे पीठ घाला. मावेल एवढे बेसन (डाळीचे पीठ) घालून घोल तय्यार करा. कांद्याला जे पणी सुटेल तेच पणी पुरेसे आहे. जादाचे पणी चुकूनही घालू नका. घातल्यास भजी कुरकुरीत होणार नाहीत. नरम होतील.

४) कडईत तेल गरम करायला ठेवा. तेल तापल्यावर घोल मध्ये २ चमचे गरम तेलाचे मोहन घाला. छान मिक्स करा.

५) आता हे कांद्याचे मिक्स कडईतील तापलेल्या तेलात थोडे थोडे घेउन पसरून भजी सोडा.

६) दोनही बाजूंनी खरपूस तळा. कांद्याची कुरकुरीत भजी तय्यार आहेत. गरम गरमच टॉमेटो सॉस व पावा बरोबर सर्व्ह करा.

  • या भजीत सोडा घालायची गरज नाही.
  • कांदा लसूण मसाल्यामुळे चव छान येते.
  • ज्यांना लसूण आवडत नाही त्यांनी तिखट टाकावे.
  • जशी कांदा भजी आपण गाडीवर खातो तशीच होईल.
  • फोटो ची क्वालिटी खराब असल्या बद्दल क्षमस्व:
मामा