" सुज्ञ जना"
संसदेत भ्रष्टाचारी बघ राज्य करी ॥ध्रु॥
रे सुज्ञ जना बघ जरा तरी ॥
निवडून येण्या पैसे वाटती।
निवडून येता पैसे लाटती॥
हे दुष्टचक्र तू थांबवी त्वरी॥१॥ध्रु॥
मतदाना तू नकोस टाळू ।
आयुष्याशी नकोस खेळू ॥
आता थांबवी ही गुंडगिरी॥२॥ध्रु॥
सर्वा ठायी करा जागृती ।
या राष्ट्राला नेण्या पुढती॥
प्रयत्न करा तुम्ही परोपरी॥३॥ध्रु॥
अनंतखोंडे.
२९।९।२०१०.