का चुकतो ठेका...

हा चुकतो ठेका पुन्हा पुन्हा
का जीव गलबले सदा कदा

ही दूर नेतसे वाट कुठे 
हे कसले जीवा लागे पिसे
ते कोण खुणावी दूर तिथे 
मी तुला निरखते तमामधे

का चंद्र भासतो फिका फिका
डोळ्यात पारवा मुका मुका...

रे मिटवू कसे हे गर्द ठसे
हे रान सभोवती मंद झुरे
टेकुनी नभाषी कोण उभे
मी मुकाट शिरते धुक्यामधे

बघ चुकतो ठेका पुन्हा पुन्हा
हा जीव गलबले सदाअ कदा...

                - प्रिया जामकर